T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, ‘या’ व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

टी 20 वर्ल्ड कप(t20 world cup) जिंकल्यानंतर संपूर्ण टीम इंडिया भारतात परतली. भारतीय क्रिकेट टीमचं स्वागत करण्यासाठी सगळेच फार उत्साही होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल झाले आहेत. पण या सगळ्यात क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविकच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

हार्दिक(t20 world cup) भारतात परतल्यानंतर नताशा स्टेनकोविक एकामागे एक अशा क्रिप्टिक पोस्ट शेअर करताना दिसते. तर दुसरीकडे हार्दिकच्या घरी खूप धामधूममध्ये त्याचे स्वागत करण्यात आले. त्याची झलक त्याची वहिणी पंखुडी शर्मानं सोशल मीडियावर शेअर केली होती.

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची वहिणी पंखुडी शर्मानं काल रात्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात हार्दिक पांड्यानं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केलं आहे. तर तो अभिनंदन HP असं लिहिलेला केक कापताना दिसत आहे.

त्यासोबत हार्दिकच्या मागे निळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांनी डेकोरेशन करण्यात आलं आहे. त्यासोबत शुभेच्छा एचपी असं इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलं आहे. हार्दिक पांड्याचं त्याच्या घरी ग्रॅंड वेलकम करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्याला पाहून लोक एकच प्रश्न करत आहेत की नताशा स्टेनकोविक कुठे आहे?

भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि हार्दिक घरी येई पर्यंत त्याची पत्नी नताशानं तिच्या नवऱ्यासाठी एकही पोस्ट शेअर केली नाही. तिनं त्याला शुभेच्छा देखील दिल्या नाही. तर नताशा फक्त क्रिप्टिक पोस्ट शेअर करताना दिसते. अशात पुन्हा एकदा नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची अफवा सुरु झाली.

दरम्यान, नताशानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ती असा मेकअप करताना दिसते. पण व्हिडीओमध्ये तिनं शेवटी लिहिलं की ईश्वर, जेव्हा मीच अडचण असेल तेव्हा मला सांभाळून घ्या, जेव्हा मी अडचणीत असेल तेव्हा माझी रक्षा करा. नताशाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. तिच्या या पोस्टनं सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा :

ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

इचलकरंजी व परिसरात बेघरांना आपलासा वाटणारा रवी दादा

नाविण्याचा ध्यास आणि माणुसकीचे प्रतिक रवी दादा जावळे