रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनताच एकीकडे चाहते आनंदाने(retirement) उड्या मारत होते… तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

आधी विराट कोहलीने सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना निवृत्तीची(retirement)घोषणा केली आणि त्यानंतर रोहित शर्माने टी-20I फॉरमॅटला अलविदा केला. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर मोठे वक्तव्य केले आहे.

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, “2026 साठी अजून बराच वेळ आहे. मी रोहित आणि विराट या दोघांसाठी खूप आनंदी आहे… भारतीय क्रिकेटचे हे दोन मोठे दिग्गज. इतकी वर्षे त्याच्यासोबत खेळणे खूप छान होते. आणि त्याच वेळी, आम्ही त्यांना ही सर्वोत्तम विदाई देऊ शकलो.”

रोहित शर्माच्या टी-20I निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला टी-20 संघाचे पूर्ण कर्णधारपद मिळू शकते. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिकने संघाची जबाबदारी स्वीकारली होती. या वर्ल्ड कप तो संघाचा उपकर्णधारही होता.

रोहित शर्माने 50 व्या विजयासह त्याची टी-20 कर्णधारपदाची कारकीर्द संपवली. या फॉरमॅटमध्ये विजयी अर्धशतक करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. या यादीत त्याच्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे, ज्याने आपल्या कार्यकाळात संघाला 48 सामने जिंकून दिले आहेत.

हेही वाचा :

१५ वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी, उपचारादरम्यान मृत्यू

झटपट बनवा चविष्ट नाश्त्यासाठी ‘एग पराठा’ – सोपी रेसिपी

बाळाच्या अभिनयाने जिंकलं वडिलांचं मन, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक!