हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!

हार्दिक पांड्या : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या मागील(business) दोन वर्षांपासून अडचणीत दिसला आहे. २०२३ च्या विश्वचषकामध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्समध्ये जेव्हा हार्दिकला कर्णधारपद दिले तेव्हा चाहत्यांनी त्याला आयपीएल २०२४ चा पूर्ण सिझन ट्रोल करण्यात आले होते.

त्यानंतर त्याच्या खासगी जीवन देखील चर्चेत होते. त्यानंतर ३ दिवसापूर्वी त्याने सोशल मीडियावर(business) त्याची पत्नी नताशासोबत घटस्फोटाची बातमी शेअर केली होती. २०२३ आणि २०२४ चे वर्ष हे हार्दिकसाठी फार काही चांगले नव्हते. आता हार्दिक पांड्याने त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

हार्दिक आता श्रीलंका दौऱ्यासाठी जाणार आहे त्याआधी त्याने नवा बिझनेस उभारला आहे. त्याने त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बऱ्याच काळापासून हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात होते. आपल्या फिटनेसबाबत प्रश्नांचा सामना करणाऱ्या हार्दिकने फॅन कोडच्या सहकार्याने आपला फिटनेस कपड्यांचा ब्रँड सुरू केला. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक दमदार व्हिडिओही शेअर केला आहे. त्याच्या नव्या बिझनेसचे नाव आहे फॅनकोड शॉप.

भारताचा संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी जाणार आहे. २७ जुलैपासून भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. यासाठी कर्णधार पदाची धुरा ही हार्दिक पांड्याला न देता सूर्यकुमार यादव कडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माचा कर्णधार असणार आहे. भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला कोचिंग देणार आहे.

हेही वाचा :

TATA कंपनीची कमाल, बाजारात आणली धमाल कूप स्टाइल SUV कार

मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; ‘या’ 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू

देशाच्या राजधानीत टोमॅटोनं केलं ‘शतक’, मुसळधार पावसाचा दरावर परिणाम