‘जे करेन ते फक्त तुझ्यासाठी’ हार्दिक पांड्याची मुलासोबत खास पोस्ट

भारताने 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावे केली. यानंतर टीम इंडियाचं (cricket exchange)भरभरुन कौतुक होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून या विजयाचं सेलिब्रेशन होत आहे. भारतीय संघ गुरुवारी मुंबईत दाखल झालं. यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या घरी विजयाचा आनंद साजरा केला. हार्दिक पांड्याने आपला मुलगा अगस्त्यसोबत खास सेलिब्रेशन केलं. यावेळी त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक मात्र गैरहजर होते.

हार्दिक पांड्याने (cricket exchange)आपल्या इंस्टाग्रामवर याचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यामधून स्पष्ट कळतंय की, त्याच्या टी 20 वर्ल्ड कप विजयाचं आनंद घरी जल्लोषात साजरा झाला. या पोस्टमध्ये हार्दिकने लिहिलं आहे की, ‘माझा#1 मी जे काही करेन, ते फक्त तुझ्यासाठी’

हार्दिक पांड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्य याचं खास नातं आहे. हार्दिकने या अगोदरही मुलासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. मुलगा हा कायमच बापासाठी जवळचा मित्र असतो. या दोघांमधील नात्यांचं वेगळेपण कायमच वेगवेगळ्या कृतीतून अधोरेखित होत असतं. फादर्स डेच्या दिवशी देखील हार्दिकने मुलासाठी खास पोस्ट शेअर केली होती.

मुलगा आणि बापाचं नातं हे कायम खास असतं. हे नातं अव्यक्त असलं तरीही या नात्यामध्ये खूप प्रेम दडलेलं असतं. बाप-लेकाचं नातं वेगवेगळ्या पद्धतीने मजबूत करु शकता. जाणून घ्या ते कसे. मुलासोबत असे घट्ट करा नाते.

जगाचा सामना करण्यासाठी मुलाला तयार करा. तुम्ही तुमच्या मुलाला सर्वांसमोरील संकोच दूर करण्यास आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करू शकता. यासाठी तुम्हाला मुलाला प्रोत्साहन द्यावे लागेल आणि त्याचा आत्मविश्वासही वाढवावा लागेल. सर्वप्रथम तुम्ही मुलाला समजावून सांगा की त्याने स्वतःला जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे. वजन, उंची किंवा आर्थिक पार्श्वभूमी यासारख्या गोष्टींचा जास्त विचार करण्यापासून मुलांना प्रतिबंधित करा. त्याला प्रोत्साहन द्या की तो आयुष्यात जे काही करेल त्यात तो यशस्वी होईल.

मुलींना त्यांच्या आईसोबत घरातील छोटी-छोटी कामे करायला आवडतात. त्याच वेळी, अनेक वेळा मुलांना तसे करण्यास नकार दिला जातो. पण, तुमचा मुलगा कितीही लाडका असला तरी त्याला घरातील कामांपासून दूर ठेवू नका. चहा बनवणे, कपडे दुमडणे, इस्त्री करणे आणि बाजारातून घरगुती वस्तू खरेदी करणे यासारख्या कामांपासून सुरुवात करा आणि तुमच्या मुलाला घर आणि स्वयंपाकघर दोन्ही सांभाळायला शिकवा. याला जीवन कौशल्य म्हणतात जे मुलाला कोणत्याही परिस्थितीत हाताळण्यास आणि स्वतःची काळजी घेण्यास मदत करतात.

हेही वाचा :

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी….

बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले

 साध्या पोह्यांपेक्षा इंदोरी पोहे कसे वेगळे? जाणून घ्या चटपटीत पोह्यांची सोप्पी रेसिपी