MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट

मुंबई: टीम इंडियाच्या कर्णधार(captain) पदावर सूर्यकुमार यादवची नियुक्ती झाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदातून हकालपट्टीच्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीवर आणि मुख्य निवडकर्त्यांवर आरोप करत, माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

श्रीकांत यांनी म्हटलं आहे की, हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरून(captain) हटवण्यामागे ड्रेसिंग रूममधील फीडबॅकचा प्रभाव असू शकतो. त्यांनी सांगितलं की, पांड्याच्या फिटनेसवर आणि आयपीएलमधील कामगिरीवर चर्चा केली गेली असावी, पण हा निर्णय तर्कसंगत नाही. श्रीकांत यांच्या मते, सूर्यकुमार यादवमध्ये कर्णधार बनण्याचे गुण आहेत, पण हार्दिक पांड्याच्या हटवण्याचे कारण पूर्णपणे स्पष्ट नाही.

अजित आगरकर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की, हार्दिक पांड्या फिटनेसच्या समस्येमुळे कर्णधारपदावरून हटवला गेला आहे आणि ड्रेसिंग रूमचा अभिप्राय विचारात घेतला गेला आहे. आगरकर यांचा हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे, कारण हार्दिक पांड्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ओळखला जातो.श्रीकांत यांनी आगरकर यांच्या सिलेक्शन कमिटीवर टीका केली असून, “अगदी स्पष्टपणे सर्वांसमोर बोला,” असं आवाहन केलं आहे. क्रिकेटप्रेमी आणि विश्लेषक यांच्यात या निर्णयावर चांगलाच वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट: रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार

रायगडमध्ये आभाळ फाटलं; तीन नद्यांनी ओलांडली धोका पातळी, शाळांना सुट्टी जाहीर

पवना धरणक्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस: एका रात्रीत पाणीसाठा 10 टक्क्यांनी वाढला