हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार

प्रसिद्ध उद्योगपती आणि RPG समुहाचे अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका(share price) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. हर्ष गोयंका यांनी आता शेअर बाजारातील शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचे युग परत आले आहे असे ते म्हणाले.

कोलकातामध्ये शेअरच्या किमतीत(share price) फेरफार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कंपन्यांचे प्रवर्तक आणि स्टॉक ब्रोकर्स यांचा समावेश आहे. हर्ष गोयंका यांनीही याप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे.

हर्ष गोएंका यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, सध्या शेअर बाजारात प्रचंड वाढ होत आहे. याचा फायदा घेण्यासाठी हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या धर्तीवर काही लोक काम करत आहेत. हे नेक्सस प्रामुख्याने कोलकाता येथून कार्यरत आहे. कंपन्यांचे प्रवर्तक प्रॉफिट एंट्रीच्या माध्यमातून आपल्या नफ्यात वाढ होत असल्याचे दाखवत आहेत. या हेराफेरीत गुजराती आणि मारवाडी दलालही सामील आहेत.

त्यांनी लिहिले की, आता अर्थ मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून चौकशी करून कारवाई करण्याची वेळ आली आहे. शेअर बाजारातील अशा चुकीच्या पद्धतींमुळे शेवटी छोट्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. या पोस्टमध्ये त्यांनी अर्थ मंत्रालयालाही टॅग केले आहे.

हर्षवर्धन गोएंका हे 1988 पासून RPG ग्रुपचे अध्यक्ष आहेत. या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 कंपन्यांचा समावेश आहे. RPG समूहाची उलाढाल अंदाजे 4.7 अब्ज डॉलर आहे. त्यांच्या या मोठ्या खुलाशानंतर शेअर बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते.

नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :

पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच

मुंबई इंडियन्ससाठी ‘या’ समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला

‘उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये’, पवारांचं सूचक विधान