भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

ह्युंदाई कंपनीने Hyundai Alcazar फेसलिफ्ट कार(car) भारतात लाँच केली आहे. कंपनीने कारचे बुकिंग आधीच सुरू केले होते. Hyundai ने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या फोन किंवा स्मार्टफोनद्वारे कारचे दार लॉक अनलॉक करू शकता. ही कार चार प्रकारांसह सादर केली आहे. तसेच या कारला दोन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आले आहे.

Hyundai Alcazar Facelift 2024 च्या पुढच्या बाजूला कंपनीच्या लोगोसह कनेक्टेड LED DRL सेटअप आहे आणि त्याच्या खाली एक मोठी ग्रिल देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना बॉक्सी एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये18 इंची अलॉय व्हील्स आहेत. ही कार(car) 15 लाख रुपयांपासून सुरू करण्यात आली आहे.

Hyundai Facelift मध्ये तुम्हाला NFC कार्ड डिजिटल की फीचर देण्यात आले आहे. Hyundai ची ही पहिली कार आहे ज्यात तुम्हाला हे फीचर मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे फीचर बहुतेक महागड्या आणि लक्झरी वाहनांमध्येच दिले जाते. त्याच्या मदतीने, वाहनाचे हँडल बंद आणि उघडले जाते.

कारच्या इतर फीचर्समध्ये तुम्हाला मोठे हेडरेस्ट्स मिळतात आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कारचे कूलिंग फीचर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने समायोजित करू शकता. मागच्या बाजूला बसणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय तुम्हाला कारमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधाही मिळते.

या कारमध्ये, तुम्हाला 360-डिग्री कॅमेरा, व्हॉईस असिस्टेड पॅनोरमिक सनरूफ, ADAS आणि पॉवर्ड हँडब्रेकसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलची फीचर्स मिळतात. यासोबतच ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोलसह टच टाइप एसी कंट्रोल पॅनल सादर करण्यात आले आहे. या कारमध्ये 10.25-इंचाची HD स्क्रीन आहे. या कारमध्ये 8 स्पीकर साउंड सिस्टीम बसवण्यात आली आहे.

हेही वाचा:

तुम्हाला माहितीय का? दारू पिण्यासाठी लागतंय लायसन्स

काँग्रेसचा बडा नेता संकेत बावनकुळेंना का वाचवत आहे? सुषमा अंधारेंचा आरोप

काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा विश्वासघात केला, हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगेंना डिवचलं