धावत्या लोकलच्या दरवाजातून पडला अन् झटक्यात गेला जीव, Video Viral

ट्रेनचा प्रवास आता अनेकांसाठी आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. ट्रेनने(flash) प्रवास करताना नेहमी सावधानी आणि आपल्या सुरक्षिततेचा विचार करायला हवा. चालू ट्रेनमधून हाथ बाहेत काढू नका, फूटबोर्डवर उभे राहू नका अशा अनेक सूचना वारंवार प्रवाशांना दिल्या जातात मात्र अनेकजण या सूचनांचे पालन करत नाहीत. ट्रेनचा वेग प्रचंड असल्याने अनेकदा दुर्घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जीवाची विशेष काळजी घ्यायला हवी. मात्र तरीही शेकडो प्रवाशी दररोज ट्रेनच्या दरवाज्यावर लटकून प्रवास करतात आणि आपल्या मृत्यूला आमंत्रण देत असतात.

ट्रेनच्या दरवाज्यावर लटकने किती महागात(flash) पडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हायरल व्हिडिओ. सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणीला ट्रेनच्या दरवाजावर लटकून जाणे फारच महागात पडल्याचे दिसत आहे. एक चुक आणि तरुण थेट मृत्यूच्या दारी पोहचला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल.

सदर घटना मुंबई रेल्वे मार्गावर घडली आहे. रोज वेळेत ऑफिसला पोहचावं, त्यानंतर घरी वेळेत जावं या विचारणे आपण नेहमी गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचा विचार करतो मात्र हा निर्णय दरवर्षीकाहींनी यावर अनेकांचा जीव धोक्यात टाकतो. दरवर्षी अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात बरेच लोक आपल्या एका लहान चुकीमुळे आपला जीव गमवून बसतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमधूनही असेच काहीसे झाल्याचे दिसून येते.

घटनेचं व्हिडिओ समोर उभ्या असलेल्या AC लोकलमधील व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ @मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha या X अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत तर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यात काहीजण रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवत आहेत तर काही वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरत आहेत.

हेही वाचा :

पंचगंगेचं पाणी शहरात शिरलं… शिरोळ तालुक्याला पुराचा धोका

महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

विधानसभेपूर्वी राजकीय वारे फिरले; अजित पवार गटाचा बडा मासा शरद पवारांच्या गळाला