कोल्हापूरजवळ BMW पार्क करून युवकाची धक्कादायक कृती; भाड्याच्या कारमध्ये घेतला धक्कादायक निर्णय!

पुणे: पुणे शहर परिसरातील काल (शनिवारी) पुण्यात एका तरुणाने आपली BMW कार(car) रस्त्यावर उभी केली त्यानंतर कारमधून उतरून लघुशंका करत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला. गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तर त्याच्यासोबत कारमध्ये आणखी एक तरूण होता, त्याच्या हातात व्हायरल व्हिडिओमध्ये दारूची बाटली असल्याचं दिसत आहे. कारमध्ये असलेल्या भाग्येश अग्रवाल या तरूणासह अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा याला देखील आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाग्येश आग्रवालची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता या वैद्यकीय चाचणीत भाग्येश ओसवाल हा गौरवसोबत बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून दारु पीत होता अशी माहिती समोर आली आहे. तर भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. यादरम्यान काल गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात लघुशंका करताना आणि अश्लील वर्तन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या 20 किमी अलीकडेच त्याने BMW कार(car) पार्क केली. Auto वाल्याला विचारलं की धारवाडला जायचं आहे. त्यासाठी चारचाकी भाड्याने मिळेल का? एका स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी मॅनेज करून दिली.
रस्त्यात संकेश्वर पर्यंत गेल्यावर गौरवने ड्रायव्हरला गाडी पुण्याच्या दिशेने वळवायला सांगितली. पुन्हा येरवड्याला सोडा, असं तो ड्रायव्हरला म्हणाला आणि त्यानंतर माफी मागण्याचा तो व्हिडिओ त्याने बनवला. गौरव आहुजाने त्या ड्रायव्हरला माफी मागताना व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला. व्हिडिओ तयार करून त्याने मित्रांना व्हायरल केला, अशी माहिती समोर आली आहे.
येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर चौकात भररस्त्यावर महागडी कार थांबवत, एक तरुण रस्त्याच्या मधोमध लघुशंका करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी त्याचा ञ मित्र कारमध्ये मद्याची बाटली घेऊन बसल्याचे दिसते. पोर्शे कार प्रकारानंतर उजेडात आलेल्या या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा माजोरड्या कृतींना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी होत आहे.
माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका; मी आठ तासांत सरेंडर होईना काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झाले, ते चुकीचे होते. मी जनता, पोलिस विभाग आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या. मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस स्टेशनला हजर होणार आहे. प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती करीत गौरव अहुजा याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कार रस्त्याच्या मध्ये पार्क करून रस्त्याच्या कडेला लघुशंका करून अश्लील वर्तन करणाऱ्या कारमध्ये गौरव आहुजा सोबत कारमध्ये बसलेल्या आणि हातात दारूची बाटली असलेल्या भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन आले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हाकलावून लावलं. तो पार्सल घेऊन आलेला तरूण पुन्हा पोलीसांनी हाकलावून लावल्यानंतर ते पार्सल घेऊन परत जाताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
हेही वाचा :
होळीआधीच महाराष्ट्रात उष्णतेची दुसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट
‘मी देहदान करणार’; धनंजय देशमुखांनी वाढदिवसाला घेतला मोठा निर्णय
भरचौकात तरुणावर सपासप वार करत हत्या, दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड