पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा ‘तो’ देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य

नागपूर : ग्रामीण पोलिस दलातून बडतर्फ पोलिस(police) कर्मचारी हा पत्नीसोबत मिळून घरीच देहव्यवसायाचा अड्डा चालवत होता. गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह व्यवसायाच्या नरकात ढकलत होता. गोपनीय माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ताजनगर परिसरातील पार्वती सहनिवास येथे त्याच्या घरी धाड टाकली. चार आरोपींना अटक करून दोन पीडितांची सुटका केली.

अटकेतील आरोपींमध्ये सचिन दिलीप मेश्राम (वय 35), सोनाली सचिन मेश्राम (वय 20, दोन्ही रा. ताजनगर, मानकापूर), आकाश अशोक जगनीत (वय 32, रा. कामठी) आणि एका 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन मेश्राम हा नागपूर ग्रामीण पोलिस(police) दलात कार्यरत होता. त्याला एका प्रकरणात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, ताजनगर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) ला मिळाली होती. मुख्य आरोपी हा महिलांना ग्राहक पुरविण्याचे काम करत असल्याचे समजले. पोलिसांनी पुरावा गोळा करण्यासाठी आपला गुप्त पंटर ग्राहक म्हणून पाठवला. पंटरचा इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि चारही आरोपींना रंगेहात अटक केली.

पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिलामध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट महिला ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली की, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका ग्राहकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे एक व्हिला बुक करण्यास सांगितले होते. नंतर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

आज अनेक ‘महासंयोग’; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करणार!

तर आपण भीकेला लागू वाल्मिक कराडचा तो खळबळजनक फोन कॉल उघड

‘अंखियों से गोली मारे’ वर गोविंदाचा मुलाचा आणि रवीनाच्या लेकीचा VIDEO