रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर
पुणे : पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून मारहाण केली. यामध्ये त्या तरूणीचा जबडा फॅक्चर(fractured) झाला आहे. मैत्रीण असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून ‘दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?’ अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजी नगरमधील मॉडल कॉलनी परिसरात घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वानवडीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत.
दिवाळीपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दुपारी बाराच्या सुमारास तरुणी ही तिच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात असताना रोहनने पाहिले होते. त्यानंतर त्याने रागाच्या भरात तिचा रस्ता अडवून तिला मारहाण केली. त्याचबरोबर, त्याने तिच्या चेहर्यावर बुक्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर(fractured) झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पतीच्या त्रासामुळे दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कोंढवा आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पहिल्या घटनेत लोहगाव भागातील संतनगरमधील महिलेने पतीच्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेला आपलं जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नयना प्रकाश माघाडे (वय 26, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय 28, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ परिसरातील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढवा भागात पतीच्या छळामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी राहुल माने (वय 36, रा. कासट कॉलनी, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा :
आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी
…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण
कोल्हापूरात राज्य उत्पादक विभागाची मोठी कारवाई !