बाप रे! फोटो काढण्यासाठी वाघाजवळ गेला अन्…; पुढे जे झालं तुम्ही पहा, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावनर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते . कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जंगली प्राणी-पक्षांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक वाघाशी संबंधित व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे म्हणतात प्राणी कोणताही असदेत पाळीव किंवा जंगली जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तोपर्यंत ते आपल्यालवर हल्ला करत नाही. पण काही महाभाग असे असतात की, हिरोगिरीच्या नादात जीव धोक्यात घालतात.
असाच काहीसा प्रकार व्हिडिओमधील लोकांसोबत घडला आहे. यामध्ये दोन लोक वाघाच्या पिंजऱ्यांत घुसून त्याच्यासोबत फोटो काढायला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत असे काही घडले आहे की त्यांना त्यांचे आख्ख खानंदान आठवले असेल.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लोक वाघाच्या पिंजऱ्यात घुसून त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही वाघाजवळ पोज देत उभे आहेत. ते वाघाजवळ पोहोचताच त्याच्यासोबत फोटो काढत असून तिथेच आणखी एक माणूस काठी घेऊन उभा असलेला दिसत आहे.
वाघाजवळ जाऊन फोटो काढणे त्या माणसांमुळे त्यांना चांगलीच महागात पडली आहे. दोघांचीही अवस्था अशी झाली आहे की पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहू शकता की, दोघेजण वाघाजवळ फोटो काढताना एक व्यक्ती वाघाला काठीने डिवचत आहे. यामुळे अचानक वाघ संतापतो आणि जोरात डरकाळी फोडतो. वाघाची डरकाळी इतकी मोठी असते की, फोटो काढणारे घाबरुन सैरावर पळू लागतात. दोघेही अगदी कसेबसे आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात.
His life flashed pic.twitter.com/gxqlI4wqRg
— Amazing Video (@amazingvideo01) July 6, 2024
व्हायरल होत असलेला व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @amazingvideo01 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देत या दोन व्यक्तींची मज्जा घेतली आहे.
एका युजरने म्हटले आहे की, नक्कीच खानदान आठवले असणार दोघांना, तचर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो काठीने डिवचणारा जास्तच शहाणा आहे. तिसऱ्या एकाने वाघाने फाडून खाल्ले असते तर लक्षात आले असते असे म्हटले आहे. तर काहींनी झू मधील कर्माचारी काय करत होते, लोक वाघाच्या पिंजऱ्यांत गेलेच कसे असे म्हटले आहे.
हेही वाचा :
‘करेक्ट कार्यक्रम करतो…22 तारखेला’; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
महाकुंभला हॅरी पॉटरची हजेरी? व्हायरल Video पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
‘या’ खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार रोहित शर्मा… मुंबईचा संघ जाहीर