तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral
एखाद्याला मदत करणे ही फार चांगली गोष्ट आहे. आपल्याला लहानपणापासूनच इतरांना सहकार्य करण्याचा, मदत करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र बऱ्याचदा आपण मदत करायला किंवा काही काम करायला गेलो की नको ते घडून बसते(Video). असे झाले की, बहुतेक लोक आपल्या नशिबाला जबाबदार ठरवतात.
सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात एक तरुण दोन महिलांची मदत करायला जातो पण घडते काही भलतेच. ही मदत त्याला चांगलीच महागात पडते. व्हिडीओत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही अपघातासंबंधित व्हिडिओ असतात तर काही थरारक स्टंट्सचे व्हिडिओ यात सामील असतात.
मात्र सध्या एका अजब प्रकारचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये आणि तरुणाचे नशीब बघून तुम्हीही डोक्याला हाथ लावाल. यात तरुणींची स्कुटी रस्त्यावर उलटी पडल्याने एक तरुण त्यांना मदत करायला जाताना दिसून येतो. मात्र घडते काही भलतेच, तरुण जातो तर तरुणींची मदत करण्यासाठी मात्र मदत न करता तो त्यांची चिंता आणखीनच वाढवून येतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, दोन तरुणी स्कुटीवरून येत आहेत. यावेळी अचानक त्यांचा तोल ढासळतो आणि या तरुणी स्कुटी घेऊन रस्त्याच्या कडेला पडतात. त्यानंतर त्या जागेवरून उठतात. त्यांची स्कुटी यावेळी जमिनीवर पडलेली असते. त्या काही करतील तितक्यात तिथे एक तरुण पळत येतो आणि त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने स्कुटी उचलण्याचा प्रयत्न करू लागतो.
तरुण स्कुटी उचलतो पण चुकून त्याचा हात एक्सीलेटरवर पडतो ज्यामुळे स्कुटी नदीच्या दिशेने पुढे जाऊ लागते. यानंतर हा तरुण स्कुटी घेऊन नदीत पडतो. स्कुटी उचलण्यासाठी आलेला हा तरुण थेट तरुणींची स्कुटी पाण्यातच फेकून टाकतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.
या सर्व प्रकारचा व्हिडिओ @yogeshkamble27 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘भाऊला परत कुणाची मदत करायची इच्छाच होणार नाही. भाऊ मदत करायला गेला होता’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “टेन्शन नका घेऊ भाऊ गाडीला अघोळ घालायला गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मिशन यशस्वीरित्या अयशस्वी”.
हेही वाचा :
सत्य काही वेगळचं, मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झाचा फोटो झाला व्हायरल
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी