मुलीला वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेला अन्…Video

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही अनेक प्रेमींचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी त्यांचे फोटो शूट तर कधी डान्स व्हिडिओ एकमेकांना प्रपोज(propose) करतानाचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

काही व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद होतो, पण काही व्हिडिओ आपल्याला धक्का देतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने मुलीला अगदी अनोख्या अंदाजात प्रपोज केले आहे. मुलीची इच्छा होती की प्रियकराने तिला खास पद्धतीने प्रपोज(propose) करावे आणि सरप्राईज द्यावे. प्रियकराने तेच केले. मात्र, या प्रपोज करण्याची पद्धत इतकी धक्कादायक होती की, मुलीला धक्काच बसला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आपल्या मित्रांसह कार घेऊन आला आहे. तो मुलीच्या कर पुढे गाडी थांबवतो. त्यानंतर कारच्या मागून काही मित्र खाली येतात. मग ते अचानक मुलीच्या कारवर हल्ला करत गाडीची तोडफोड करतात. यामुळे मुलगी घाबरते. त्याच वेळी अचानक तो मुलगा फुलाचा गुलदस्ता घेऊन तिच्यासमोर येतो आणि एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. हा प्रकार इतका धक्कादायक होता की मुलगी घाबरते आणि रडायला लागते. मात्र, त्यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार तिच्या प्रियकराचा असल्याचे समजताच ती त्याला मिठी मारते आणि रडते.

सध्या या अनोख्या प्रपोज करण्याच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर meme.dya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

एका युजरने म्हटले आहे की, रोमॅंटिक मॅन, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचारीला कोमात पाठवले बाबा. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, भारी प्रपोज केला भावाने. तर त्याची काय चुक तीच म्हणली होती ना वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज कर असेही एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल जाला असून लाको व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा :

कडाक्याच्या थंडीत पावसाचा धडाका: राज्यात वरुणराजाचा कहर

अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला