झोपेत शरीर संबंध ठेवायचा नंतर लाथ मारून बेडवरून ढकलायचा.. माजी महिला खासदाराच्या दाव्याने खळबळ

ब्रिटनच्या माजी खासदार केट नाइवेटन यांनी पहिल्यांदाच जगासमोर वैवाहिक जीवनातील अनेक वेदना उघड केल्या आहेत.(bed) मेट्रोच्या वृत्तानुसार, केट यांनी तिचे माजी पती आणि माजी खासदार अँड्र्यू ग्रिफिथ्स यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केट या 2019 ते 2024 सालापर्यंत युकेच्या बर्टन मतदारसंघातून खासदार होत्या. ग्रिफिथ्सने झोपेत तिचे लैंगिक शोषण केले, तो त्यांच्या नवजात बाळावर ओरडला आणि जेव्हा केटने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा तो म्हणाला, “कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.” असा दावला केट यांनी केला आहे.

काही वेळा मी अत्याचारादरम्यान रडायचे आणि ते पाहून रागाच्या भरात ग्रिफिथ्सने मला अनेकदा लाथ मारून बेडवरून खाली ढकललं असा धक्कादायक दावाही केट यांनी केला आहे. .केट म्हणाली की, 2013 साली तिचं ग्रिफिथ्सशी लग्न झालं आणि 2018 साली ते दोघे वेगळे झाले. बाहेरून पाहणाऱ्यांसाठी ग्रिफिथ्स एक मनमिळावू, मोहक आणि आनंदी व्यक्ती होता. तो खूप चलाख आणि मनमिळावू होता.” आता मी विचार करते तेव्हा जाणवतं की काही संकेत दिसत होते. पण तेव्हा मी असा विचार करायचे की तो ग्रिफिथ्स कामामुळे ताणात आहे. ”

पण प्रत्यक्षात तिचे आयुष्य नरक बनले होते. केट म्हणाली की ग्रिफिथ्सने अनेक वर्षे तिचे शोषण केले. (bed) “केट, कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी येथील खासदार आहे, पोलिस माझा खूप आदर करतात ” असंही तो तिला म्हणायचा.ग्रिफिथ्स अनेकदा झोपेत तिच्यावर जबरदस्ती करायचा असा दावाही केटने केला. मला जेव्हा जाग यायची तेव्हा तो आधीच सेक्स करत असायचा. कधीकधी मी चूपचाप सहन करायचे, पण कितीतरी वेळा मला रडू यायचं. काही वेळा तो ग्रिफिथ्स थांबायचा, पण मग त्याचा मूड खराब व्हायचा आणि तो लाथ मारून मला बेडवरून खाली ढकलायचा. मी दुसऱ्या खोलीत जाऊन दार बंद करायचे किंवा सरळ घरातून बाहेर पडायचे, असा दावाही केटने केला.

पण केटसाठी सर्वात वेदनादायक क्षण आला, जेव्हा तिनं पाहिलं की तिची दोन आठवड्यांची मुलगी देखील ग्रिफिथ्सच्या रागाची बळी बनत आहे. एके दिवशी सकाळी, जेव्हा त्यांची छोटी मुलगी दुधासाठी रडत होती, तेव्हा ग्रिफिथ्स तिच्या अंगावर इतक्या जोरात ओरडला की ते ऐकून केट घाबरलीच.(bed) त्याच क्षणी तिन ठरवलं की ती आता हे सहन करू शकत नाही आणि तीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :