वर्ष 2021. कोल्हापूर, सांगलीत महापूर आलेला. जिकडे-तिकडे पाणीच पाणी. लोक पुराच्या पाण्यात अडकलेली. घरे बुडाली, जनावरे मृत झाली. हे दिवस कोल्हापूर, सांगलीकरांना आठवले तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. या दोन्ही जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना पूर येण्याचे कारण म्हणजे कृष्णा नदीवर उभारलेले अलमट्टी धरण(dam). हे धरण कर्नाटकात आहे. आता या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटकने घेतलाय. त्याला आता दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडाडून विरोध सुरू केलाय. त्यासाठी आंदोलन उभारले आहे. अलमट्टी धरणाची उंची किती वाढविली जाणार आहे. त्याचा सांगली, कोल्हापूरला कसा फटका बसेल हेच आता हे पाहुया…

अलमट्टी धरण(dam) हे कृष्णा नदीवर बांधलेले असून, उत्तर कर्नाटकातील बिजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. हे धरण हे अप्पर कृष्णा इरिगेशन प्रोजेक्टचा मुख्य जलाशय आहे. या धरणातून कर्नाटकातील विजयपूर, बागलकोट, गुलबर्गा, यदगीर आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये 16.47 लाख एकर जमीन सिंचनखाली येते.
धरणाची पाणी साठवण क्षमता तब्बल 123 टीएमसी आहे. या धरणाची सध्याची उंची 519.6 मीटर आहे. पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने धरणाची उंची 524.25 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. परंतु हा प्रस्ताव सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याला महाराष्ट्रातून कडाडून विरोध होतोय. धरणाची उंची वाढविल्यास कर्नाटकला फायदा होईल. परंतु महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरला त्याचा फटका बसेल तो कसे हे पाहु…
अलमट्टी धरणामुळे(dam) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनते. सांगली, मिरज आणि शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते. त्यामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचही प्रचंड नुकसान होते. जीवितहानीचाही मोठा धोका असतो. 519 मीटर उंची असताना ही स्थिती आहे. तर अलमट्टीची उंची सहा मीटरने वाढवून ती 524 मीटर केली तर महापुराच्या पाण्याचा फुगारा आणखी वाढून स्थिती भयावह होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढविण्याला या दोन जिल्ह्यातून मोठा विरोध होतय. पूर येण्याचे कारणे ही अनेक आहेत.
अलमट्टी धरणाची उंची आणि त्यातील पाण्याचा साठा वाढल्यास कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह मंदावतो. यामुळे धरणाच्या मागील बाजूला असलेल्या सांगली, कोल्हापूरच्या नदीत पाण्याची पातळीच वाढते. त्याचा पावसाळ्यात मोठा फटका बसतो. जेव्हा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला जातो, तेव्हा बॅकवॉटरमुळे नदीकाठच्या भागात पूर येण्याची शक्यता वाढते. 2005, 2019 आणि 2021 मध्ये याचा फटका आपलेला बसलेला आहे.
2019 आणि 2021 मधील महापूरांच्या वेळी, अलमट्टी धरणातील पाण्याचा साठा आणि त्याचा विसर्ग यांचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पूरस्थितीवर झाल्याचे स्थानिक आणि तज्ज्ञांचे मत आहे. 2019 मध्ये धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्याने आणि पाण्याचा साठा जास्त असल्याने महाराष्ट्रातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.

धरणाची उंची 519.6 मीटरवरून 524.25 मीटरपर्यंत वाढवल्यास पाण्याचा साठा वाढेल. ज्यामुळे महाराष्ट्रातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र अभ्यास सुरू केला आहे. ज्यामध्ये धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि पूरपरिस्थितीच्या परिणामांचा विचार केला जात आहे.
धरणाची उंची वाढवल्याने कर्नाटकातील वीस गावे पाण्याखाली जाणार आहे. तेथील लोकांचे पुनर्वसन करावे लागेल. महाराष्ट्रातील काही गावांनाही याचा फटका बसू शकतो, ज्यामुळे स्थानिकांना स्थलांतर करावे लागेल.अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला 2010 मध्ये कृष्णा जलविवाद लवादाने परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांनी याला विरोध केलाय. हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे महाराष्ट्रातील पूरस्थिती, शेतीचे नुकसान, स्थलांतर आणि आंतरराज्यीय जलविवाद वाढले. हा विषय कायदेशीर आणि राजकीय पातळीवर लढला जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटमध्ये सीमावाद आहे. तो नेहमीच उफळून येत असतो. परंतु महाराष्ट्राला कर्नाटकबरोबर धरणावर संघर्ष करण्याची वेळ आलीय. कर्नाटकचे काँग्रेसचे सरकार आहे. तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात संघर्ष होऊ शकतो. अशा परिस्थित केंद्राला हस्तक्षेप करायची वेळ येऊ शकते.
हेही वाचा :
‘तुला ब्लाउज काढावं लागेल’, बिग बींच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी करताच…
शरीराच्या ‘या’ पाच भागांवर टॅटू काढताय? तर जरा थांबा अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!