पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी: पुतिन यांच्या पाठिंब्यानं दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या जाणार

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(news) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप पर्यटकांच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

रणधीर जयस्वाल यांनी X अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की, रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा(news) तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शविला. या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, यावर पुतिन यांनी भर दिला.

रणधीर जयस्वाल यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, पुतिन यांनी या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे, यावर भर दिला. दोन्ही नेत्यांनी विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पुतीन पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतिन यांना विजय दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे(news). परंतु, अद्याप दहशतवादी पकडले गेले नाहीत.

काश्मीरच्या या भागात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांना पाठलाग करण्यात अडचण येते. शोध मोहीम राबवावी लागते. यूएस जिओग्राफिकल सर्व्हे नुसार, पहलगाम जवळील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या सुमारे अर्ध्या उंचीचा आहे, तो बैसरनपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. हा पर्वत या प्रदेशात खडकाळ पर्वतरांगा आणि पूर्वेकडे घनदाट जंगलांचे जाळे तयार करतो, जिथे दहशतवादी लपले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा :

विद्येच्या मंदिरात महिला शिक्षिकांचे जोरदार भांडण; VIDEO तुफान व्हायरल

‘हे बेकायदेशीर आहे,’ क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच असं घडलं; फलंदाजाच्या खिशात चक्क…; VIDEO व्हायरल

अर्रर्र! हिल्सवर थिरकणं महिलेला पडलं महागात; पाय घसरला अन्…, Viral Video