मुसळधार पावसानं आला रस्त्याला पूर; तरूण दुचाकीसह गेला वाहून, थरारक VIDEO
मुंबई : हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तेथील एक व्हिडिओ(VIDEO) समोर आलाय. युसूफगुडा येथील कृष्णा नगरमध्ये एका दुचाकीसह एक तरूण रस्त्यावर पाण्याच्या जोरदार प्रवाहात तरंगताना दिसल आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. त्यामुळे दुचाकीस्वाराचं थोडं नियंत्रण सुटलं अन् तो दुचाकीसोबत पाण्यात वाहून जायला लागला.
हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या(VIDEO) प्रमाणावर हाल होत आहेत. येथे, युसूफगुडा येथील कृष्णा नगरमध्ये एका दुचाकीसह एक व्यक्ती रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी इतर दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, ते दोघेही काही अंतरावर वाहून जाताना दिसले.
परंतु सर्वजण घटनेतून बचावले असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानंतर २० ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.
सुर्या रेड्डी नावाच्या X अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हैदराबादमधील युसुफगुडा येथील कृष्णा नगर येथील रस्त्यावरील पुरात एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेल्याचं दिसलं. दोन लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असताना ते देखील काही अंतरापर्यंत वाहून गेले होते. नंतर या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं.
हैदराबादमध्ये पहाटेच मुसळधार पाऊस पडला. हॅश टॅश हैदराबाद पाऊस, असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला गेलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरूण एकदम बिनधास्तपणे दुचाकी चालवत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह खूप वाढतो, अन् त्याचा धक्का दुचाकीस्वाराला बसतो. त्यामुळे दुचाकीसोबत तरूण वाहून जाताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हेही वाचा :
मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”
ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव
“तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही, आम्हाला लाडकी बहीण नको, न्याय द्या”, आंदोलक महिलेचा संताप!