मुंबईत अतिवृष्टी ,मुसळधार पावसामुळे सर्व शाळा बंद
मुसळधार पावसामुळे (rain)मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारी, ९ जुलै २०२४ रोजी मुंबई महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या जोरदार पावसामुळे शहरात जलभराव आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पालिका प्रशासनाने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आणि आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून सावधान राहण्याचेही सांगितले आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सूचना जारी केल्या जातील. नागरिकांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :
“मनोज जरांगें’तुमची चार माकडं’ फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल’
“अशी सासू प्रत्येक सुनेला मिळो”, प्रत्येक सुनेने पाहिला पाहिजे हा व्हायरल व्हिडिओ
मधुमेह आणि पोटाचा फुगा कमी करण्यासाठी संशोधकांचा दावा
.