राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार पाऊस

राज्यात यंदा पावसाची(rain) चांगली सुरूवात झाली आहे. सगळीकडे वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना आणि विदर्भ बुलढाणा जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात इतरही जिल्ह्यांत वादळी जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

लातूर जिल्ह्यात सर्वदूर रात्रभर संततधार पाऊस(rain) सुरू होता. लातूरच्या कासारशिरसी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढ्याला पुर आल्याचं दिसत आहे. त्यामुळे कासारशिरसी ते कर्नाटकात जाणारा मार्ग बंद झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि दमदार पाऊस या भागात पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जालन्यात कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पाऊसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. सोलापूर, सातारा, मुंबई आणि पुण्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

पहिल्याच पावसात दोन्ही शहरांची दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर सध्या वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने काम सुरू असलेला पुल गेला वाहून गेला आहे. त्यामुळे मिरज मालगावचा संपर्क तुटला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज मुंबई, पालघर, ठाणे, धाराशिव, लातूर, परभणी, रायगड, नगर, पुणे, सांगली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, (Rain Update) सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, नागपूर, वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरांत सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण केल्याने रस्ते जलमय झाले आहेत.

हेही वाचा :

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक.

लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला.

भुजबळांचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील ब्लेझर, चष्मा अन् दाढी..

सांगली: चार शतकांचा असणारा वटवृक्ष कोसळला