राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार, यलो अलर्ट जारी; पुढील 48 तास पावसाचे..
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. कडाक्याची थंडी गायब झाली असून त्याची जागा ढगाळ वातावरणाने घेतली आहे. आज सर्वत्र ढगाळ हवामान दिसून येत आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार(rain)पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे आहेत. हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह (rain)पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले आहे. या हवामानात थंडी जवळपास गायब झाली आहे.
शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता राहिल. या ठिकाणी गारपीट होईल. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहिल. यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहिल आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
‘भूल भुलैया 3’ प्रेक्षकांच्या भेटीस! नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी होणार रिलीज
बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न आहे? ‘या’ परीक्षांची सुरु करा तयारी; आयुष्यभरासाठी व्हाल मालामाल
एअरटेल युजर्ससाठी धक्का! देशभरात नेटवर्क ठप्प, इंटरनेट आणि कॉलिंग ठप्प झालं”