जवानाची पराक्रमी कृती: मृत्यूच्या दाढेतून प्रवाशाचे प्राण वाचले, व्हिडिओ व्हायरल
आजकाल कधी कोणासोबत काय घडेल याचा काही नेम नाही. आपण म्हणतो की, आपला मृत्यू (passenger)कोणाच्याही हातात नसतो मात्र ही गोष्ट चुकीची ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका CISF जवानाने विमानतळावर एका प्रवेशाचा जीव मृत्यूच्या कचाड्यातून वाचवल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण आवाक् झाले असून अनेक नेटकरी आता या जवानांची प्रशंसा करत आहेत.
या घटनेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (passenger)पथकाने तातडीने एका प्रवाशाचे प्राण वाचवले. सीआयएसएफ जवानाने वेळीच सीपीआर देऊन प्रवाशाला मृत्यूपासून वाचवले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओने आता अनेकांची मने जिंकली आहेत.
ANI च्या वृत्तानुसार, प्राण वाचवलेल्या प्रवेशाचे नाव अर्शिद अय्युब असून 20 ऑगस्ट रोजी श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. ANI ने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अर्शिद सामान घेऊन उभा असताना अचानकपणे कोसळल्याचे दिसून येते. यांनतर जवळील लोकांनी त्याच्या भोवती एक घेरा जमा केला. घटनेविषयी समजताच तिथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानाने त्याला लगेच सीपीआर दिला आणि क्षणार्धात त्याचा जीव वाचला.
ANI ने एक्सवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने कमेंट्स करत सीआयएसएफ जवानाचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटकरी हा व्हिडिओ पाहून सुखावले आहेत.
हेही वाचा :
तेल कंपन्यांकडून आजचे दर जाहीर, एक लिटर पेट्रोल किती रुपयांना?
क्रूरतेचा कळस! सावत्र आईनेच चिमूकल्याच्या गुप्तांगावर दिले गरम चाकूने चटके
कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..