लीलावतीपासून घर १५ मिनिटांवर, मग २ तास का लागले; सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. दरम्यान आज एक मोठा दावा करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील त्याच्या घरी १६ जानेवारी रोजी २.३० वाजता हल्ला झाला होता. मात्र तब्बल १ तास ४१ मिनिटांनी ४:११ वाजता सैफला लीलावती रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलपासून त्यांच घर केवळ १०-१५ मिनिटांच्या अतंरावर असतानाही इतका वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सैफ अली खानचं घर लीलावती रुग्णालयापासून(hospital) फक्त १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असूनही, त्याच्या वैद्यकीय अहवालात असे म्हटले आहे की, हल्ला पहाटे २:३० च्या सुमारास झाला होता, परंतु त्याला पहाटे ४:११ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांद्रे पोलिसांना सादर केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की त्याला त्याचा व्यवस्थापक आणि मित्र अफसर जैदीने रुग्णालयात दाखलं केलं होतं, ज्यामुळे असे सूचित होते की जैदी त्याला रुग्णालयात घेऊन गेला असावा.

आयएएनएसने शेअर केलेल्या सैफच्या वैद्यकीय अहवालात असे सूचित केले आहे की त्याला चाकू हल्ल्याच्या जवळजवळ दोन तासांनंतर लीलावती रुग्णालयात (hospital) आणण्यात आले होते. तथापि, त्याला कोणी आणले याबद्दल वेगवेगळे वृत्त आहे. सुरुवातीला, डॉक्टरांनी सांगितले होते की सैफ त्याचा ८ वर्षांचा मुलगा तैमूर अली खानसह ऑटो-रिक्षातून आला होता.

मुंबईतील वांद्रे येथील गुरु शरण अपार्टमेंटमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या संदर्भात, मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. पण इतर कोणत्याही व्यक्तीची भूमिका अद्याप उघड झालेली नाही.

डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की, वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील ८५/२५ क्रमांकाच्या आधारे सविस्तर तपास करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले आहेत. आरोपींच्या बोटांच्या ठशांमध्ये विसंगती असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पोलिसांना अद्याप बोटांच्या ठशांशी संबंधित कोणताही अहवाल मिळालेला नाही.

हे नमुने तपासणीसाठी फिंगरप्रिंट ब्युरोकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत. फिंगरप्रिंटबाबत आतापर्यंत दोन प्रकारचे मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. एका प्रकरणात असे म्हटले होते की बोटांचे ठसे जुळले आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात जुळत नसल्याचे नोंदवले गेले.

हेही वाचा :

शनिवारीही खुला राहणार शेअर बाजार, NSE ने जाहीर केले का केला बदल

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत केवळ इतकी

कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता…