क्लासी लूकमध्ये Honda Elevate Black Edition लाँच

भारतातील प्रमुख प्रीमियम कार उत्पादक कंपनी, होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) ने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही, होंडा एलीव्‍हेटच्या दोन नवीन आणि एक्‍सक्‍लुसिव्‍ह एडिशन्स लाँच(launched) केले आहेत. होंडा एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशन आणि होंडा एलीव्‍हेट सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशन असे या कार्सचे नाव आहे. हे खास एडिशन्स नवीन क्रिस्टल ब्‍लॅक पर्ल रंगामध्ये सादर करण्यात आले आहेत. या लाँचद्वारे होंडाने भारतीय बाजारपेठेमध्ये वाढती लोकप्रियता आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीला लक्षात घेतले आहे.

होंडा एलीव्‍हेटच्या ब्‍लॅक एडिशन्‍सच्या लाँचविषयी(launched) बोलताना, होंडा कार्स इंडिया लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ताकुया त्सुमुरा म्हणाले, “होंडा एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशन आणि सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनमध्ये साहस आणि आकर्षकता यांचा विलक्षण मिलाफ आहे. हे स्पेशल एडिशन्स स्टाइल आणि नाविन्याला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर ठरतील. आम्हाला विश्वास आहे की या एडिशन्समुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये दीर्घकालीन प्रभाव निर्माण होईल.”

नवीन एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशनचे डिझाइन अत्यंत आकर्षक आणि थ्रिलिंग आहे. या कारमध्ये स्लिक ब्‍लॅक रंग, ब्‍लॅक अलॉय व्‍हील्स आणि नट्सचा समावेश आहे, जे रस्‍त्‍यावर एक वेगळेच थ्रिल निर्माण करते. याशिवाय, अपर ग्रिलवर क्रोम अ‍ॅसेंट्स आणि सिल्‍व्‍हर फिनिश फ्रंट आणि रिअर स्किड गार्निशेस, लोअर डोअर गार्निश आणि रूफ रेल्‍स या घटकांनी कारला एक समकालीन, प्रीमियम लूक दिला आहे. टेलगेटवर ‘ब्‍लॅक एडिशन’ एम्‍ब्‍लेम ही एक खास वैशिष्‍टता आहे.

तुम्ही लक्‍झरी आणि विशिष्‍टतेला अधिक महत्त्व देत असाल, तर होंडा एलीव्‍हेट सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशन एक उत्तम पर्याय आहे. या एडिशनमध्ये, ऑल-ब्‍लॅक स्टाइलिंगसह ब्‍लॅक अलॉय व्‍हील्स आणि नट्स आहेत. फ्रंट फेंडरवर अतिरिक्‍त ‘सिग्‍नेचर एडिशन’ एम्‍ब्‍लेमही आहे, जी त्याच्या विशिष्‍टतेला आणखी ठळक करते.

स्पोर्टी आणि अत्‍याधुनिक इंटीरिअर
दोन्ही एडिशन्‍सच्या इंटीरिअरमध्ये अपस्‍केल ऑल-ब्‍लॅक थीम आहे. ब्‍लॅक लेदरेट सीट्स, प्रीमियम ब्‍लॅक थ्रेड स्टिचिंग, ब्‍लॅक डोअर पॅड्स, आर्मरेस्‍ट्स आणि इन्स्ट्रुमेंट पॅनेल यांद्वारे कारमध्ये एक अत्याधुनिक आणि आकर्षक अनुभव मिळतो. सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनमध्ये ७ रंगांची रिदमिक अ‍ॅम्बियंट लायटिंग असून, त्याने केबिनला एक लक्‍झरीअस अनुभव दिला आहे.

प्रोसेस आणि इंजिन
दोन्ही एडिशन्‍स टॉप-ग्रेड झेडएक्‍स वर आधारित आहेत, जे १.५ लीटर आय-व्‍हीटेक पेट्रोल इंजिनने चालवले जातात. मॅन्‍युअल आणि सीव्‍हीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असलेल्या या कारला ग्राहक आकर्षक आणि कार्यक्षमतेतून उत्तम अनुभव देतात.

उपलब्धता
होंडा एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशन आणि सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनचे बुकिंग भारतातील सर्व होंडा डीलरशिप्सवर सुरू झाले आहे. ब्‍लॅक एडिशन्‍सच्या सीव्‍हीटी व्हेरियंटची डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून सुरू होईल, तर मॅन्‍युअल ट्रान्समिशन व्हेरियंटची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.

किंमत किती?

होंडा एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशन

  • झेडएक्‍स एमटी: ₹15,51,000
  • झेडएक्‍स सीव्‍हीटी: ₹16,73,000

होंडा एलीव्‍हेट सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशन

  • झेडएक्‍स एमटी: ₹15,71,000
  • झेडएक्‍स सीव्‍हीटी: ₹16,93,000

होंडाच्या नव्या एलीव्‍हेट ब्‍लॅक एडिशन्‍सने भारतीय ग्राहकांना एक प्रीमियम, लक्‍झरी आणि स्पोर्टी अनुभव देण्याचा हेतू ठेवलेला आहे. नुकतेच होंडा एलीव्‍हेट ब्लॅक एडिशन मार्केटमध्ये लाँच झाली आहे. या नवीन कारमध्ये कंपनीने अनेक फीचर्स समाविष्ट केले आहेत. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

हेही वाचा :

धावत्या बसमध्ये माजी आयएएस अधिकाऱ्याला मारहाण, कंडक्टरचं संतापजनक कृत्य Video

‘मला जीवे मारण्याची धमकी…’, मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी

हुश्श! चीनमधून दिलासादायक बातमी; HMPV परतीच्या मार्गावर…