रिल्स काढण्याच्या वेडामुळे भीषण अपघात; रेल्वेखाली संपूर्ण कुटुंब ठार
नाशिक: सोशल मीडियावर (social media)रिल्स बनवण्याच्या धाडसामुळे एका कुटुंबावर मोठं संकट आलं आहे. नाशिकजवळील रेल्वे ट्रॅकवर रिल्स काढताना संपूर्ण कुटुंबाला आपले प्राण गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेत आई, वडील आणि दोन लहान मुलं रेल्वेखाली आल्यामुळे जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब नाशिकजवळील एका रेल्वे ट्रॅकवर धोकादायक पद्धतीने रिल्स शूट करत होतं. त्याचवेळी एका वेगाने येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली, ज्यामुळे कोणालाही सुटण्याची संधी मिळाली नाही. स्थानिकांनी लगेचच प्रशासनाला कळवले, पण दुर्दैवाने संपूर्ण कुटुंब जागीच मृत झालं होतं.
सोशल मीडियावर वाढत चाललेलं रिल्स काढण्याचं वेड आता धोकादायक ठरतं आहे. या घटनेने पुन्हा एकदा समाजाला सतर्क होण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनीही अशा घटनांबाबत सतर्कतेचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आणि सोशल मीडियावर सुरक्षिततेसाठी अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन केलं जात आहे.
हेही वाचा:
६० लाखांचं पॅकेज मिळवून Google मध्ये नोकरी; पुण्याच्या तरुणीचा जबरदस्त यशस्वी प्रवास!
शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक