रुग्णालयात हलगर्जीपणाचा बळी कर्मचारी; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

मुंबई – सेंट जॉर्जेस रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू(death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मृत कर्मचारी अनिश कैलास चौहान हे रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन तासांहून अधिक काळ त्यांना कोणताही उपचार मिळाला नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चौहान हे डोक्याला पट्टी बांधून व्हीलचेअरवर बसलेले दिसत आहेत.

या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर चौहान यांचे नातेवाईक आणि मित्र जमा झाले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चौहान यांच्या मित्राने सांगितले की, जोपर्यंत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत ते मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.

रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक रुग्णालयांमधील आरोग्य सेवा आणि सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विनयभंग करून ॲसिड हल्ल्याची धमकी, आरोपी फरार

महापालिकेच्या मनसे शाखेवरील कारवाईला खंडणीचा अडसर?

कॉल गर्ल ते नागा चैतन्यची वधू: शोभिता धुलिपालाचा अविस्मरणीय प्रवास