“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (political news) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सगळीकडे प्रचार सुरु आहे. दरम्यान यावेळी सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

संगमनेर मतदारसंघातील(political news) धांदरफळ येथे युवा संकल्प सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलत असताना वसंतराव देशमुख यांची जिभ घसरली. बोलत असताना देशमुख म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांची नात ती तर बोलती म्हणत्यात, माझा बाप सगळ्याचा बाप काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे.

देशमुख एवढंच नाही बोलले तर, पुढे ते म्हणाले की, आपल्या कन्येला समजवा. जर आम्ही मैदानात उतरलो तर, तुमचr मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजय दादा प्रेमाने तिला ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं देखील वसंतराव देशमुख म्हणाले.

संगमनेरमध्ये घडलेल्या प्रकारणानंतर, महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाचा मी जाहीर निषेध करते. अहिल्यानगरच्या पोलिसांना पत्र लिहित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांबाबत कुणी अशी विधानं करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाहीत, असं चाकणकर म्हणाल्या आहे.

हेही वाचा :

अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!

मोहम्मद शामीच्या करिअरवर पूर्णविराम? बीसीसीआयने घेतला निर्णय

गरोदर प्रेयसीला ठार करुन गाडलं; पोलिसांनी कारण विचारलं तर म्हणतो, ‘ती फार…’