दारूच्या सेवनानंतर व्यक्तीच्या मेंदूमध्ये कसे होतात बदल?

अनेकांना दारू पिण्याची सवय असते. दारू पिणं हे आरोग्यासाठी (invalid person)धोकादायकच असतं. दारू प्यायल्यानंतर आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.सध्याच्या तरूणाईचं पार्टी कल्चर असून यामध्ये मद्यपान करणं सामान्य गोष्ट आहे. घराबाहेर फिरायला गेल्यावर किंवा मित्रांसोबत अनेकजण मद्यपान करतात. काही लोकांना दारूचं इतकं व्यसन असतं, की त्यांना रात्री झोप देखील लागत नाही. या स्थितीचा तुमच्या हृदयावर, मनावर त्याचप्रमाणे शरीरावर गंभीर परिणाम होतो.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, मद्यपान करणारे नक्कीच अल्कोहोलचे फायदे अतिशयोक्ती करतील. मात्र दारू पिण्यामुळे होणारे नुकसान कितीतरी पटीने जास्त आहे.हार्ट फेल्युअर असोसिएशन ऑफ द युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी HFA-ESC 2022 नुसार, दारूच्या सेवनामुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्याचप्रमाणे याचा परिणाम इतर अवयवांवर देखील परिणाम (invalid person)होतो.

दारूच्या सेवनामुळे ब्लड सर्कुलेशनवर खूप गंभीर परिणाम होतो. हे मेंदूच्या कार्यावर आणि कार्य करण्याच्या पद्धतीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. दारूच्या सेवनामुळे मानसिक संतुलन, स्मृतिभ्रंश आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने न्यूरॉन्समध्ये बदल होतात, जसं की त्यांचा आकार कमी होतो. प्रौढांच्या मेंदूपेक्षा तरुण व्यक्तींचे मेंदू अल्कोहोलच्या नकारात्मक प्रभावांना अधिक संवेदनशील असतात, असं संशोधनातून समोर आलं आहे. शिवाय अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे (invalid person)मेंदूच्या कार्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा :

फडणवीस-पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात कसोटी

समरजितसिंह तुतारी फुंकण्यावर ठाम या तारखेला शरद पवार गटात प्रवेश

बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना सुनावले मुलीला नीट सांभाळण्याची चेतावणी