ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला किती मिळणार पोटगी?

बॉलिवूड(Entertainment) विश्वातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांच्या खासगी आयुष्यात एक संकट आलं आहे. कारण आता ए आर रेहमान आणि सायरा बानू विभक्त होणार आहेत. यासंदर्भात ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर घटस्फोटाची अधिकृत घोषणा देखील केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर(Entertainment) ए आर रेहमान यांचा घटस्फोट होत असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक तर्क-वितर्क वारवले जात आहेत. अशातचं आता ए आर रेहमान यांची संपत्ती आणि त्यांच्या पत्नीला किती पोटगी मिळणार? याबाबतीत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

तर ए आर रेहमान यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच रेहमान यांनी गायलेल्या गाण्यांवर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तसेच 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोजा’ सिनेमासाठी ए आर रहमान यांना तब्बल 25 हजार रुपये मिळाले होते.तसेच या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

याशिवाय ए आर रेहमान हे ऑस्कर पुरस्कार विजेते हॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, रेहमान यांच्या मालकीचे एक अपार्टमेंट आहे, ज्यात त्यांचा स्टुडिओ आहे. एआर रहमानचे मुंबई, लंडन आणि लॉस एंजेलिसमध्ये केएम म्युझिक स्टुडिओ नावाच्या अनेक स्टुडिओचे ते मालक देखील आहेत.

तर आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमातील एका गाण्यासाठी ए आर रेहमान हे 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेत आहेत. याशिवाय त्यांची देशातील मोठ-मोठ्या शहरांमध्ये देखील संपत्ती आहे. परंतु आता घटस्फोटानंतर सायरा बानू यांना पोटगी म्हणून त्यांना किती संपत्ती मिळेल याबद्दल मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

तिने प्रेमसंबंधाला नकार दिला अन् तरुणाने ”त्या’ फोटोंचं असं काही केलं की…

सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण