तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदरांची खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची? 

दिवाळीचा(festival) सण आता जवळ आला आहे. भारतातील प्रमुख सणांपैकी हा एक आहे. देशभरात हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त जागोजागी दिव्यांची रोषणाई दिसते. अनेक घरात आता दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नवीन कपड्यांची खरेदी, साफसफाई आणि फराळ बनवणे अशा गोष्टींची तयारी दिवाळीच्या आधीच सुरु असते. आता फराळ म्हटलं की, यात चविष्ट पदार्थ हे आलेच. या दिवाळीच्या पदार्थातीलच एक प्रमुख आणि चविष्ट पदार्थ म्हणजे शंकरपाळी!

शंकरपाळी हा पदार्थ दिवाळीच्या(festival) फराळात आवर्जून बनवला जातो. मात्र अनेकांना घरी हवी तशी शंकरपाळी बनवता येत नाही. तशी सोपी असली तरी शंकरपाळी बनवण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तुम्हालाही या दिवाळीत परफेक्ट शंकरपाळी बनवायची असेल तर आजच्या टिप्स तुमच्यासाठी फार फायद्याच्या ठरणार आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज घरीच खुसखुशीत शंकरपाळी तयार करू शकता.

खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही यात बेसन आणि रव्याचा वापर करू शकता. बेसन पिठामुळे शंकरपाळ्यांची चव आणखीन वाढते तर रव्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यास मदत मिळते. त्यामुळे शंकरपाळ्या बनवताना नेहमी कणकेच्या पिठात एक चमचा बेसन पीठ आणि रवा घालावा. याने तुमच्या शंकरपाळ्या आणखीन छान होतील.

तुपाचे प्रमाण योग्य ठेवा
शंकरपाळ्या(festival) बनवताना तुपाचे प्रमाण फार महत्त्वाची भूमिका बजावत असत. हे शंकरपाळ्यांच्या टेक्सचरवर परिणाम करत. त्यामुळे नेहमी शंकरपाळ्या बनवताना तुपाचे योग्य प्रमाण घेणे गरजेचे असते. तुपामुळे शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होण्यास मदत होते. दोन कप पिठासाठी यात साधारण दोन चमचे तुपाचे प्रमाण घ्या. लक्षात ठेवा जास्त तूप घातलत तर शंकरपाळ्या तेलकट होतील आणि कमी तूप घातलत तर शंकरपाळ्या कडक होतील.

साखरेचं मिश्रण अधिक घट्ट नसावे
साखरेचा पाक तयार करताना त्याची कन्सिस्टन्सी योग्य असायला हवी. साखर आणि पाणी मिक्स करून ते उकळवून याचा पाक तयार करा. मात्र हा पाक जास्त घट्ट झाला तर शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते. हा पाक मध्यम घट्ट असावा, जेणेकरून शंकरपाळ्या गोड आणि खुसखुशीत होतील. जर तुम्हाला खुसखुशीत शंकरपाळ्या हव्या असतील तर एका कढईत साखर घेऊन यात थोडे दूध टाका. साखर विरघळेपर्यंत दूध शिजवत रहा आणि मग गॅस बंद करा.

मऊ पीठ मळा
शंकरपाळ्या करताना कणिक मऊ असणे गरजेचे असते. खूप घट्ट पीठ मळल्याने शंकरपाळ्या कडक होऊ शकतात. तसेच पीठ मळताना यात किंचित मीठ आणि वेलची पावडर घाला. मग यात साखर दुधाचे मिश्रण टाका आणि हळूहळू पीठ मळायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, पिठाचा गोळा जास्त सैल किंवा मऊ देखील असू नये. पीठ घट्ट झाल्यास तुम्ही यात आणखीन दुधाचा वापर करू शकता. पीठ फार पातळ असेल तर शंकरपाळ्यांना पदर पडत नाहीत.

तळताना तेलाचे योग्य प्रमाण ठेवा
शंकरपाळ्या तळताना तेलाचे योग्य प्रमाण असायला हवे, नाहीतर शंकरपाळ्या बिगडू शकतात. तेल फार गरम असेल तर शंकरपाळ्या बाहेरून पटकन तळून जातात पण आतून कच्च्या राहतात, आणि तेल फार थंड असेल तर शंकरपाळ्या तेलकट होतात. त्यामुळे मध्यम आचेवर तेल तापवून शंकरपाळ्या छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे शंकरपाळ्या अगदी समानपणे तळल्या जातील आणि खुसखुशीत देखील होतील.

हेही वाचा :

जुनी कार देईल दमदार मायलेज, फक्त इंजिनची अशी घ्या योग्य काळजी

सूरजच्या घराचे भूमीपूजन; अजित पवारांचे आभार मानत म्हणाला, ‘दादांचे मनापासून आभार…’

आमिर खानच्या सात किसिंग सीनचा किस्सा; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी तर लॉटरीच लागली…’