कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला हा सल्ला

जागतिक बाजारातील(stock market) मिश्र संकेतांमुळे आज ११ जून रोजी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० यांची सुरुवात मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी करताना आणि विक्री करताना सावध राहावं लागणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात.

मंगळवारी, १० जून रोजी देशांतर्गत शेअर बाजार स्थिर राहिला. सेन्सेक्स ५३.४९ अंकांनी म्हणजेच ०.०६% ने घसरून ८२,३९१.७२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १.०५ अंकांनी वाढून २५,१०४.२५ वर बंद झाला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमध्ये सतत वाढ होत असतानाही, मंगळवारी प्रमुख बेंचमार्क निर्देशांक स्थिर राहिले. १० जून रोजी बँक निफ्टी निर्देशांक २१०.५० अंकांनी किंवा ०.३७% ने घसरून ५६,६२९.१० वर बंद झाला. निफ्टीमध्ये ग्रासिम, टेक महिंद्रा आणि डॉ. रेड्डी हे प्रमुख वाढत्या कंपन्यांमध्ये होते.

स्टॉक मार्केट(stock market) टुडेचे सह-संस्थापक व्हीएलए अंबाला यांनी सांगितलं आहे की, बँक निफ्टीला आजच्या सत्रात ५६,५०० – ५६,०३० च्या आसपास आधार मिळू शकतो आणि ५७,३५० आणि ५७,७०० च्या जवळील प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणत्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात, याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, मारुती सुझुकी, आयआयएफएल फायनान्स, बँक ऑफ बडोदा, केन्स टेक्नॉलॉजी, टेक्समॅको, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, इंडिगो, विप्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, क्रेडिटअ‍ॅक्सेस ग्रामीण हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

बाजार तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्या जाणाऱ्या शेअर्ससाठी नेटवर्क १८, सुझलॉन एनर्जी, ऑलकार्गो गती, फिलेटेक्स इंडिया आणि ऑटोलाइन इंडस्ट्रीज यांची शिफारस केली आहे. आज निफ्टी ५० च्या भविष्याविषयी बोलताना प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी सांगितलं आहे की, निफ्टी ५० निर्देशांकात पुन्हा एकदा मंदीचे सत्र दिसून आले. निर्देशांक २५,००० क्षेत्राच्या वर स्थिरावला आहे आणि टिकून राहिला आहे. बँक निफ्टी निर्देशांक, मजबूत तेजीनंतर, गेल्या दोन सत्रांपासून हळूहळू घसरत आहे.

आज खरेदी करायच्या स्टॉकबद्दल(stock market), वैशाली पारेख यांनी नेटवर्क 18, नेल्को आणि झायडस लाईफसायन्सेस या तीन स्टॉक्सची खरेदी किंवा विक्रीसाठी शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया , टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन , बँको प्रॉडक्ट्स (इंडिया), डेटा पॅटर्न (इंडिया) आणि अलाइड ब्लेंडर अँड डिस्टिलर या स्टॉक्सची खरेदीसाठी शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

हेही वाचा :