हंपबॅक व्हेलने जिवंत माणसाला गिळले पण पुढच्याच क्षणी जे घडलं… Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये आता सर्वांना अचंबित करत आहेत. तुम्ही आजवर सोशल मीडियावरअनेक व्हिडिओज पाहिले असतील मात्र मृत्यूचा असा हा थरार तुम्ही क्वचितच कधी पाहिला असावा. सध्या व्हायरल(Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका हंपबॅक व्हेल जिवंत माशाला गिळल्याचे दिसते. यानंतर त्याच्या वाचण्याची काही शक्यता वाटत नाही पण तितक्यात असा काही चमत्कार घडून येतो की पाहून सर्वच आवाक् होतात. ही घटना कोणत्या चमत्कराहून कमी नाही.

वास्तविक, हंपबॅक व्हेलने चिलीच्या पॅटागोनियाजवळ एका माणसाला थोडक्यात गिळंकृत केले. मात्र काहीच वेळात त्याला कोणतीही इजा न त्याने सोडून दिले. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जी आता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) होत आहे.

ही घटना गेल्या शनिवारी घडली. मॅगेलनच्या सामुद्रधुनीतील सॅन इसिद्रो लाइटहाऊसजवळ बाहिया एल एगुइला येथे ॲड्रियन सिमांकस त्याच्या वडिलांसोबत कयाकिंग करत असताना एका हंपबॅक व्हेल पाण्यात आली, त्याने कयाकवर असलेल्या एड्रियनला काही सेकंद गिळंकृत केले आणि नंतर त्याला सोडले.

जेव्हा एड्रियन सिमांकासला व्हेलने गिळले तेव्हा त्याचे वडील डेल काही मीटर दूर होते. आपल्या मुलाला व्हेलच्या तोंडात जाताना पाहून वडील अजिबात घाबरले नाहीत आणि त्यांनी उत्तमरीत्या ही गोष्ट हाताळली. जेव्हा व्हेलने एड्रियनला सोडले तेव्हा डेलने आपल्या मुलाला शांत राहण्यास सांगितले.

व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलाला “शांत राहा, शांत राहा” असे सांगत असल्याचे ऐकू येते. वडील डेलने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान घटनेतील थरार बघता कुणालाही यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे पण काल्पनिक वाटणारी ही घटना खरोखर सत्यात घडली आहे. याचा व्हिडिओ @Osint613 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये , ‘चिलीच्या एका कायकरला हंपबॅक व्हेलने गिळंकृत केले होते पण तो कसा तरी इजा न होता बाहेर आला’ असे लिहिण्यात आले आहे.

व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुळात मी इतक्या मोठ्या पाण्यात जाण्याचा विचारच करणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित माशाला त्याची चव आवडली नसावी”.

हेही वाचा :

मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीने गुपचूप नणदेच्या खोलीत घुसून असं कांड केलं की…नवरदेवावर रडण्याची वेळ

सतत बसून काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ चुका टाळा

ब्रेकअपनंतर मलायकाची अनोखी प्रतिक्रिया, अर्जुन कपूरसमोर केलं असं काही की सगळेच थक्क!