फेसबुकवरील ‘आशिक’साठी नवऱ्याची किडनी विकली, 10 लाख घेतले आणि पत्नीने…

फेसबुकवर आशिक मिळाल्यानंतर पोटच्या लेकीला शिकवण्यासाठी 10 लाख हवेत, असा तगादा लावत नवऱ्याची किडनी(kidney) काढून तब्बल 10 लाख रुपये घेऊन आशिकसोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सनकी महिलेने आपल्या पतीची किडनी 10 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

यानंतर ती सर्व पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेली, पोलिसांनी सांगितले की, महिलेने तिच्या पतीला तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्यास सांगितले. आणि 10 लाख रुपयांना किडनी(kidney) विकण्यास भाग पाडले. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील संकरेलमध्ये घडली असून या तक्रारीनंतर बायकोचा कारनामा पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पत्नी गेल्या एक वर्षापासून किडनी विकून पैसे मिळवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पतीने तक्रारीत म्हटले आहे. या पैशातून ती घर चांगल्या पद्धतीने चालवणार असून आपल्या 12 वर्षांच्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणार असल्याचे तिने सांगितले. यानंतर त्याने किडनी विकण्याचे मान्य केले आणि खरेदीदाराशी करार केला. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर पतीने पैसे घरी आणले. त्याच्या पत्नीने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आणि लवकर बरे होण्यासाठी बाहेर पडू नये असे सांगितले.

त्या महिलेचा पतीच्या कुटुंबीयांनी मित्र आणि ओळखीच्या लोकांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला होता. तेव्हा हावडापासून दूर कोलकात्याच्या उत्तर उपनगरातील बराकपूरमध्ये येथील एका घरात ही महिला आढळून आली. ती ज्याच्यासोबत पळून गेली होती, तोही याच घरात राहत होता. महिलेने सांगितले की, ती फेसबुकवर तिच्या प्रियकराला भेटली होती. दोघेही गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.

पोलिसांनी सांगितले की, तिचा पती, सासू आणि मुलगी बराकपूर येथील व्यक्तीच्या घरी गेले असता तिने बाहेर येण्यास नकार दिला. तिच्या प्रियकराने तिला सांगितले की ती त्याला घटस्फोट देईल, तिच्या सासरच्या मंडळींनी लग्नानंतर 16 वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला.

पत्नीने संकरेल येथील सासरच्या घरातूनही रोख रक्कम घेतल्याचे पीडितेच्या पतीने नाकारले. पोलिसांनी सांगितले की, ते आधी महिलेचा प्रियकर आणि तिच्या पतीच्या कुटुंबातील संभाषणाचा व्हिडिओ पाहतील. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी महिला आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली जाईल.

हेही वाचा :

आज मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार

निवडणुकीच्या तोंडावर ‘त्या’ आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापुरातील पर्यटकांसाठी खुशखबर! विशाळगडावर जाण्यासाठी आणखी एका तासाची वेळ वाढवली