पतीने पत्नीला गळा दाबून मारले, हत्येच्या नंतर टोलनाक्यांवर चकवा; खुनी पती जेरबंद

किरकोळ कौटुंबिक कारणातून(Murderer) पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम पतीला खालापूर पोलिसांनी फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून अटक केली आहे. गणेश घोडके असे त्याचे नाव आहे.

पत्नीचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून तो नंतर बाथरूममध्ये फेकून (Murderer)कारने फरार झालेला गणेश दोन टोलनाक्यांवर चकवा देऊन सटकला. मात्र सातारच्या आणेवाडी टोलनाक्यावर त्याच्यावर खालापूर पोलिसांनी झडप घातली.

मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाळशीळ येथील गणेश घोडके गेल्या पाच महिन्यांपासून खोपोलीजवळील लौजी- चिंचवली शेकीन येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये पत्नीस राहत होता. त्याचे किरकोळ कारणांवरून पत्नीसोबत भांडण झाल आणि त्याने पत्नी शीतल हिच ओढणीने गळा आवळून तिची हत्य केली. त्यानंतर तिचा मृतदेह पांघरुणान गुंडाळून तो बाथरूममध्ये ठेवला जाताना त्याने मित्र अशुतोष देशमुख याला घडलेला प्रकार मोबाईलवरून कळवला.

अशुतोषने दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी गणेशच्या कारच्या नंबरप्लेटवरून तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी गणेशची कार उर्से टोलनाका ओलांडून गेल्याचे कळले.

खोपोली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सातारच्या दिशेने जाणाऱ्या गणेशने खेड शिवापूर टोलनाक्यावरही पोलिसांना चकवा दिला. मात्र पोलिसांनी सातारा आणेवाडी टोलनाक्यावर आधीच फिल्डिंग लावली आणि तिथे गणेशला जेरबंद केले.

हेही वाचा :

दुर्दैवी! कटेलली पतंग पकडण्याचा नादात शाळकरी मुलाचा मृत्यू; परिसरात शोककळा

‘माझ्याकडून चुका होतात’, PM मोदींच्या पहिल्या पॉडकास्टमधील मोठा खुलासा!

Video: फडणवीसांचा काँग्रेसला सुरूंग लावण्याचा प्लान ठरला; भाजपातील नाराजी नाट्यात नव्या ‘वारा’ची एंट्री