ह्युंडाईची नवी कार लाँच, पेट्रोल-डिझेलसह मायलेज दमदार
मुंबई : स्वताचं घरं असाव हे जसं सर्वसामान्याचं स्वप्न असतं, तसेच आपली हक्काची चारचाकी कारही(car) असावी असेही स्वप्न मध्यमवर्गीयांकडून पाहिलं जातं. बजेटमधील कार घेण्यासाठी साधारण 6 ते 10 लाख रुपये मोजावे लागतात. त्यामध्ये, उत्तम आणि आरामदायी कार ग्राहकांच्या दारात येते.
मात्र, दमदार एसयुव्ही घ्यायची असल्यास आणखी पैसे मोजावे लागतात. आता, जग्रप्रसिद्ध ह्युंदाई कंपनीची नवी स्टायलीश आणि आकर्षक कार(car) मार्केटमध्ये अवतलली आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार इंटेलिजण्ट व्हर्साटाइल अशा स्वरुपातील ही कार असून इण्टेन्स 6 व 7 सीटर एसयूव्ही लाँच करण्यात आली आहे.
नवीन ह्युंदाई अल्काझारच्या 1.51 Turbo पेट्रोल Executive MT (75) मॉडेलची किंमत 14 लाख 99 हजार आहे. तर, कंपनीच्या 1.51 डिझेल Executive MT (75) कारची किंमत 15 लाख 99 हजार एवढी आहे. 6 व 7 सीटर कन्फिग्युरेन्समध्ये उपलब्ध आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार शक्तिशाली व फन-टू- ड्राइव्ह कार्यक्षमता देते.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएम) ने आज 1.51 टर्बो पेट्रोल Executive MT (75) कारचे लाँचिग केले असून या कारची लाँचिंग प्राईस 14 लाख 99 हजार एवढी आहे. तर, 1.51 डिझेल मॉडेलची किंमत 15 लाख 99 हजार रुपये आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार या दोन प्रकारच्या किंमतीमध्ये लाँच करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या प्रवास अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जात व सीटर प्रीमियम एसयूव्ही तिची भव्यता, आरामदायीपणा व सोयीसुविधा, तंत्रज्ञान, उत्साही कार्यक्षमता आणि प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्यांसह त्यांचा प्रवास अधिक सुखकर करेल, असा विश्वास ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी म्हटले आहे.
कारच्या लाँचप्रसंगी बोलताना उन्सू किम म्हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये आम्ही आमच्या विविध व वैविध्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्साहपूर्ण अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत. तसेच, आम्ही ग्राहकांच्या बदलत्या गरजा जाणून घेण्याप्रती समर्पित आहोत, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सतत विकास करत आहोत.
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारमधून ही कटिबद्धता दिसून येते. आम्हाला इंटेलिजण्ट, व्हर्सांटाइल व इण्टेन्स एसयूव्ही लाँच करण्याचा आनंद होत आहे, जी एसयूव्ही श्रेणीमधील भव्यता, आरामदायीपणा व सोयीसुविधेमध्ये अधिक गुधारणा करेल. आम्हाला विश्वास आहे की, ही एसयूव्ही आमच्या ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्व देईल.” आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार इंटेलिजण्ट, व्हर्साटाइल, इण्टेन्स. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ग्राहकांना अपवादात्मक गतीशीलता अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे.
आकर्षक डिझाइन हयुंदाईच्या मेन्युजम स्पोर्टनिसच्या ग्लोबल डिजाइन ओलखीवर डिझाइन करण्यात आलेली आकर्यक नवीन ह्युंदाई अल्काझार भारतातील रस्त्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. बारकाईने निर्माण करण्यात आलेण्या एसयुव्हीमध्ये ऐसपैस जागा, मोठे व उंच स्टान्स आहेत, जे रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नवीन एच शेप्ड एलईडीआरएल, विशिष्ट क्वॉड-बीम एलईडी हेडलॅम्स, नवीन हुड हिलाइन, शक्तिशाली फ्रन्ट, बम्परमह नवीन स्कीड प्लेट आणि नवीन डार्क क्रीम फ्रंट ग्रिल अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेली प्रीमियम 6 व 7 मीटर एसयूव्ही निश्चितच रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईन.
एसयूव्हीच्या लूकमध्ये अधिक आकर्षकतेची भर करत नवीन आर 18 (व्यास 462 मिमी) डायमंड कट अलॉईव्हील डिझाइनसह पेंटेड कॉर्डिंग आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारला डायनॅमिक प्रोफाइल देतात. अद्वितीय ब्रिज टाइप रेल रुप, तसेच मोठी, उंच व आधुनिक रिजर डिझाइन एसयूव्हीला अधिक सुधारित स्टान्स देतात.
1.5 मीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिनची शक्ती (6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व स्पीड डीसीटी) आणि 1.5 लीटर यू2 सीआरडीआय डिझेल इंजिनची शक्ती (पीट मॅन्युअल ट्रान्समिलन व स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशम)
आकर्षक एक्स्टीरिअर डिझाईनलाइन यावरील क्षवेधक उपस्थितीसाठी मोठेच स्टान्स देते
इंटीरिअर्स केबिनमध्ये शांतमय, हाय-टेक व आरामदायी प्रवासाचा अनुभव देते.
आरामदायी वैशिष्टये – दुसऱ्या रांगेमध्ये बाय कुशन एक्सटेंशनसह दुसऱ्या रांगेत व्हेण्टिलेटेड सीट्स, सीट्समध्ये सुधारित कूशनिंग व बॉल्स्टरिंग, विंग टाइप हेडरेस्ट बाणि इतर अनेक
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार(car) एनएफसी तंत्रज्ञान असलेला डिजिटल कीसह येते.
ह्युंदाई स्मार्टसेन्स लेव्हल 2 एडीएएससह 19 वैशिष्टये ट्रायटिंग सुरक्षितता, सोयीसुविधा आणि पार्किंग सुरक्षिततेची खात्री देतात
40 प्रमाणित व 70 हून अधिक एकूण सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सरांऊड व्ह्यू मॉनिटर, 6 एअरबॅग्ज, रेन मेन्सिंग वायपर्स, हिल डिसेंट कंट्रोल, चारही डिस्क ब्रेक्स आणि इतर अनेक
9 आकर्षक रंग पर्यायांसह नवीन रॉबस्ट एमरॉल्ड मॅट
4 विशिष्ट व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम बाणि सिग्नेचर
हेही वाचा:
“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी
कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 11 दिवस आधी ऑगस्ट महिन्यातच विराजमान होणार बाप्पा