मी कायम चुकीच्या पुरुषांवर 12 अफेअर्सनंतर बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत अनेक कलाकार आपल्या(famous) प्रोफेशनल करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला , जिने आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले, पण तिचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरले.मनिषा कोईराला गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच राहते, पण वयाच्या 53 व्या वर्षीही ती खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा मोकळेपणाने भाष्य केले आहे. “मी कायम चुकीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला आणि प्रेम केले, त्यामुळेच माझ्या आयुष्यात प्रेम कधीच टिकू शकले नाही,” असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

“मी कायम चुकीच्या पुरुषांकडे आकर्षित झाले…” :
मनिषा कोईरालाने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, “मी सतत चुकीच्या पुरुषांकडे आकर्षित होत राहिले. प्रत्येक वेळी विचार करायचे की हे नेमकं माझ्यासोबतच का होत आहे? मीच काहीतरी चूक करत आहे का? याचा खोलवर विचार केल्यावर लक्षात आलं की मी अशा लोकांकडे ओढले गेले, जे माझ्यासाठी योग्य नव्हते.”

तिने पुढे सांगितले, “गेल्या 5-6 वर्षांपासून मी एकटीच आयुष्य जगत आहे. मला एक चांगले आणि स्थिर नातं हवं आहे. अशा व्यक्तीसोबत असावं वाटतं, जो माझा आणि माझ्या स्वप्नांचा आदर(famous) करेल. एकमेकांसोबत प्रामाणिक राहणं महत्त्वाचं असतं. आपल्या प्रवासात एकमेकांना साथ देऊ शकतो का, हेही पाहणं गरजेचं आहे.”
मनिषा म्हणते, “माझ्या जोडीदारात स्वप्न पाहण्याची ताकद आणि जीवनाबद्दल उत्कटता असायला हवी. कारण मी खूप भावनिक आहे, मला अशा व्यक्तीची गरज आहे जो माझ्या भावना समजेल.”

मनिषा कोईरालाचे नाव बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत जोडले गेले. तिच्या नावाची सर्वात मोठी चर्चा अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत झाली होती. मात्र, (famous) त्या काळात नाना पाटेकर विवाहित होते.त्याशिवाय तिचे नाव विवेक मुशरान डिजे हुसैन, सेसिल एंथनी, आर्यन वेद, प्रशांत चौधरी , क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी , राजीव मूलचंदानी आणि क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत देखील चर्चेत राहिले.

हेही वाचा :

30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र

इचलकरंजी पत्नीचा मृत्यू, अन् पतीने घेतली कृष्णा नदीत पुलावरून उडी

तुमच्या मुलीला लग्नात चुकूनही ‘या’ भेटवस्तू देऊ नये, अन्यथा..