‘मी पक्षाचा अध्यक्ष, तू टॉप काढून मसाज कर’; VIDEO काढून महिलेला धमकी

‘मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर(threatened) तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन’, अशी धमकी देणार्या आणि खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडी भागात असलेल्या एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात घडली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ४० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा सगळा प्रकार ३ फेब्रुवारीला घडला होता. रोहित वाघमारे त्याच्या मित्रासह धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाजसाठी गेला होता. यावेळी त्याने शर्टच्या खिशात मोबाईल चालू ठेवला होता.
मसाज करत असताना वाघमारे यानं त्या महिलेला अंगावरील टॉप (threatened)काढण्यास सांगितले. त्या महिलेने ही गोष्ट करण्यास नकार दिला. महिलेने नकार दिल्यानंतर त्यानं धमकी दिली. ‘मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन’, अशा शब्दात त्यानं महिलेला धमकावले.
महिलेनं नकार दिल्यानंतर वाघमारेनं त्या ठिकाणी २-३ जणांना बोलावून घेतलं. यावेळी त्यानं महिलेला ‘२० हजार रुपये दे, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिली. तसेच त्या ठिकाणी असलेल्या काऊंटरमधून पैसे घेऊन तेथून तिघंही पसार झाले. महिलेनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तपास करत रोहित गुरुदत्त वाघमारे, शुभम चांगदेव (threatened)धनवटे आणि राहुल ज्ञानेश्वर वाघमारे या तिघांना अटक केली आहे. या आरोपींपैकी एक पत्रकार असून त्याचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आणि एक वृत्तपत्र असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा :
UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज!
अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!
आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी