मीच तुतारीच्या नेत्याला फोन केला अन्…; धनंजय मुंडेंचे सूचक विधान

परळी : माझ्याविरूद्ध लढण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली होती. पण शरद पवार(political news) यांच्या राष्ट्रवादीकडून तुतारीचा उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत होता. त्यामुळे मीच त्यांच्या एका नेत्याला फोन करून माझ्या विरोधात लवकरात लवकर उमेदवार फायनल करायला सांगितलं, असं मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पण आता त्यांच्य या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या(political news) प्रचारसभेचा धुराळा उडू लागला आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परळीतील घाटनांदूर विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. “माझ्याविरोधात तुतारीकडून लढण्यासाठी एवढे जण तयार झाले होते. पण काही तुतारीचे निष्ठावंत माझ्या मतदारसंघात फिरायला लागले. त्यांच्या नेत्याला विचारून मलाच भिडू लागले. त्यांचे नेते प्रत्येकाला कामाला लागा, असं म्हणायचे.

बारा-तेरा जणांसोबत असंचं झालं. मग मलाच काळजी वाटू लागली. पण तिकीट तर एकालाच मिळणार होतं. म्हणून मीच तुतारीच्या एक नेत्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं की, माझ्या विरोधात लवकरात लवकर तिकीट फायनल करा. पण ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते येडे झाले आणि कागद वेचत फिरू लागले. पण इथला प्रतिनिधी आहे. म्हणन त्यांची काळजी वाटू लागली होती.

धनंजय मुंडे म्हणाले की, ” तुतारीकडून निवडणूक लढण्यासाठी अनेकजण उतावळे होते. एकाच घरातून आई बी, लेक बी, जावई बी…. अनेकजण नडायला लागले. पण मलाच काळजी वाटू लागली होती. तुतारीचे असले तरी एवढ्या ताकदीने कामाला लागले होते.पण तिकीट मात्र एकालाच मिळणार ते.

त्यामुळे बाकीच्यांचं कसं होणार, याची मला काळजी वाटू लागली होती. म्हणून मीच तुतारीच्या एका नेत्याला मीच फोन लावला आणि माझ्याविरोधात उमेदवार लवकर फायनल करा, असं सांगितलं. पण ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यातले दोघं वेडे झाले आणि फिरायला लागले. तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजीसुद्धा मलाच करावी लागेल ना…असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा :

भाजपला दणका! भाजप नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

आज शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ