‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर
मतदानाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात(political) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यातच विरारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तर राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला.
विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. या हॉटेलमध्ये काल भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा पाहायला मिळाला.
अशात विनोद तावडे यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये(political) विनोद तावडे एका सभागृहात सभा घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही विनोद तावडे हे “दहा मिनिटे बोलू द्या” असं सांगताना व्हिडिओत दिसून येतंय. कार्यकर्त्यांसोबत चहा घेत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी सभा घेतली.
बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर, तावडे यांनी निवडणूक आयोग आणि कायदा याकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांसमोर भाषण ही केले. यावर बहुजन विकास आघाडीने कारवाईची मागणी केली आहे.
विनोद तावडे हे काल मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
विनोद तावडे यांच्याबद्दल माहिती असणारी डायरी आपल्याकडे असल्याचा दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. जोवर विनोद तावडे खाली येऊन बोलत नाहीत. तोवर मागे हटणार नाही. तावडेंना बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी घेतली होती. यानंतर हॉटेलमध्ये पोलीसही दाखल झाले होते.
त्यानंतर विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या शेजारी बसून पत्रकार परिषद घेतली. आम्ही वोटिंग मशीनची माहिती दिली होती. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही. वास्तव आम्ही सांगितलं. हितेंद्र आप्पांनीही सांगितलं. आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय ते करतील, असं विनोद तावडे म्हणाले होते.
तर, हितेंद्र ठाकूर म्हणाले की, तुम्ही इथे कशाला आला होता?, इथे डायऱ्या सापडल्या. एकाच रुममध्ये 10 लाख रुपये होते. हे पैसे कुणाचे आहेत? आता हितेंद्र ठाकूरचे होते म्हणून सांगू नका.असं असेल तर मी घेऊन जातो. मला उपयोगी पडतील कामधंद्याला, असं खोचकपणे हितेंद्र ठाकूर पत्रकार परिषदेत म्हणाले.
हेही वाचा :
रिया सेनच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल
स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींना मिळणार भरभरून यश, मोठं पदही मिळणार!