‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य

‘बिग बॉस 17’ या रिॲलिटी शोमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता(actor) समर्थ जुरेल त्याच्या बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. आज समर्थला कोणत्याही ओळखीची गरज नाही, पण सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने ‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंडची गरज वाटते’ असे खळबळजनक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बिग बॉसच्या घरात असतानाच समर्थ जुरेल(actor) आणि ईशा मालवीय यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यांनी बिग बॉसच्या घरात प्रेमाची कबुली देत, आधीपासूनच एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. पण शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. ईशा मालवीयसोबत ब्रेकअपनंतर समर्थ कोणालाही डेट करत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नसल्याचे समर्थने नुकतेच सांगितले.

समर्थने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यात त्याने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. त्याने सांगितले की, ईशानंतर त्याने कोणालाही डेट केलेले नाही. ‘माझ्याकडे या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आणि मी सध्या कामात व्यस्त आहे. रिलेशनशीपमध्ये येण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. मला कामात व्यस्त राहणे आवडत आहे,’ असे समर्थ म्हणाला. पण समर्थच्या या वक्तव्यावर पारसचा विश्वास बसला नाही.

या पॉडकास्टमध्ये समर्थने सांगितले की, केवळ दोन तासांसाठी कोणीतरी गर्लफ्रेंड असावी, असे त्याला सतत वाटते. ‘मला एखाद्या मुलीला गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा होते. रात्री केवळ दोन तासांसाठी गर्लफ्रेंड असावी असे वाटते,’ असे समर्थ म्हणाला. त्याचं हे वक्तव्य ऐकून पारस छाबडाला धक्का बसला. त्यानंतर समर्थने स्वतःची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी रात्री पार्टीसाठी जातो, तेव्हा इतर मित्रांच्या गर्लफ्रेंड त्यांच्यासोबत असतात. ते पाहून माझीदेखील गर्लफ्रेंड असावी, असे वाटते.’

हेही वाचा :

Fasttag च्या नियमांमध्ये नवीन बदल…

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं वादग्रस्त ट्विट

मोठी बातमी! राज्यात डान्सबार कायद्यात बदल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय