‘मैं अकेला ही चला था मगर,…’ ; छगन भुजबळ यांच्या शायरीला CM देवेंद्र फडणीसांचं उत्तर

‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’, अशी(Shayari) शायरी छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात नायगावमध्ये सावित्रीबाईच्या मूळगावी आयोजित एका कार्यक्रमात बोलून दाखवली.

त्याच्या या (Shayari)शायरीतही मंत्रिमंडळातून डावलल्याचा नाराजीचा सूर होता. दरम्यान त्यांच्या या शायरीला मुख्यंमत्री देवेंद्र फडवीस यांनीही प्रतिसाद देत ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ असं एकप्रकारे उत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना मांडल्या. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावरही पोहोचले होते. आता एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याजवळील नायगाव या सावित्रीबाईच्या मूळगावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाराज छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. ते एकत्रच कार्यक्रमाला पोहोचले असेही म्हटले जात आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना उद्देशून एक शेर म्हणून दाखवला.

छगन भुजबळ म्हणाले, “हरी नरके यांनी या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. देवेंद्र जी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात म्हणून तुमचे धन्यवाद.

सावित्रीबाईच्या नावाने पुरस्कार दिला जात होता. तो पुन्हा सुरु करुन सावित्रीबाईच्या जयंतीदिनी द्यायला हवा. महात्मा फुलेंच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हायला हवे अशी विनंती करतो.” त्यानंतर त्यांनी ‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’ हा शेर भुजबळांनी म्हटला.

भुजबळ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांनी बोलताना भुजबळ यांना उद्देशून ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ हा शेर म्हटला.

पुढे त्यांनी नायगावच्या सरपंचांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले. सहा वर्षांनी सावित्रीबाई फुलेंची द्वीशताब्दी सुरु होणार आहे. त्याआधी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा :

‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये

2025 मध्‍ये स्‍वत:च्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला द्या प्राधान्य, कसा असावा आहार

ट्रेड फायनांस ऑफिसरच्या पदासाठी SBI मध्ये भरतीचे आयोजन; १५० रिक्त जागांना भरण्यात येणार