लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ए दिल है मुश्कील’ (screen)या चित्रपटामध्ये आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावली होती. त्यांच्या ऑन-स्क्रीन रोमान्सची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. एकदा या चित्रपटासंदर्भात एका रेडिओ मुलाखतीदरम्यान रणबीरने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या रोमान्सबद्दल असे काही सांगितले होते की बच्चन कुटुंबाला देखील राग आला होता. आता रणबीर नेमकं काय म्हणाला होता चला जाणून घेऊया…

‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे काही रोमँटिक सीन दाखवण्यात आले होते. हे सीन शुट करताना रणबीर खूप घाबरला होता. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही त्याला लाज वाटल्याचे त्याने कबूल केले होते. ऐश्वर्या एक अनुभवी आणि व्यावसायिक अभिनेत्री आहे. तिला नैसर्गिक पद्धतीने (screen)अभिनय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यामुळे सीन शूट करत असताना तिला सतत ती केवळ अभिनय करत असल्याची जाणीव करुन देण्यात आली होती.

रणबीरने एका रेडिओ चॅनेलला तेव्हा मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तो मजेशीर अंदाजात म्हणाला होता की, ‘त्यावेळी मी विचार केला की, अशी संधी मला कधीच मिळणार नाही. म्हणून मीही जागेवरच चौकार मारला!’ रणबीरचे हे वक्तव्य बच्चन कुटुंबीयांना आवडले नसल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या(screen) होत्या. एका वृत्तपत्राच्या अहवालात असे म्हटले होते की कुटुंबातील एका जवळच्या मित्राने उघड केले की बच्चन कुटुंबाला चित्रपटातील दृश्यांवर कोणताही आक्षेप नव्हता. परंतु त्यांना रणबीरची टिप्पणी चुकीची आणि लाजिरवाणी वाटली. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा मुद्दा समजून घेत रणबीरने लगेचच तो काय बोलला हे स्पष्ट केले होते
हेही वाचा :
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल