मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण…; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा
टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकून (win box) आता 2 दिवस झाले आहेत. मात्र तरीही भारतीय चाहते या सुखाच्या क्षणांमधून बाहेर आलेले नाहीत. वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू फार खूश होते. अशातच विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान यावेळी रोहितच्या म्हणण्यानुसार, निवृत्ती घेण्याचं रोहितचं अजिबात मन नव्हतं. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, त्याने रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची (win box)घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली. रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, ही आता या फॉर्मेटमला गुडबाय म्हणायची वेळ आली आहे. मला वर्ल्डकप हवा होता आणि मला तो मिळाला आहे.
निवृत्ती घेताना रोहित शर्माने सांगितलं की, अंतिम सामन्यानंतर निवृत्त होण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेईन असं वाटले नव्हतं पण परिस्थिती अशी निर्माण झाली आणि निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटलं. विश्वचषक जिंकल्यानंतर निरोप घेण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. मी नक्कीच आयपीएल खेळत राहीन.
सर्व T20 वर्ल्डकप खेळणारा रोहित शर्मा सध्या एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 2007 च्या T20 वर्ल्डकप टीमचा भाग होता. त्यानंतर आता 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीमने ही स्पर्धा जिंकली. रोहित शर्माने त्याच्या अफाट कारकिर्दीत एकूण 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 4231 रन्स केले. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक 5 शतकांचा विक्रमही आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 32 अर्धशतकं झळकावली आहेत.
भारताने टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात सेलिब्रेशन करत होते. मात्र दुसरीकडे रोहित शर्मा पीचवर बसलेला दिसून आला. आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे. म्हणजेच ज्या मातीने त्याला त्याला इतका मोठा विजय मिळवून दिला त्याच मातीला चाखून रोहितने प्रणाम केला आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन?
जुलैपासून सिमकार्ड पोर्ट करणं होणार कठीण: नवीन नियम लागू
मोठी बातमी! पंकजा मुंडेंची विधानपरिषेदवर वर्णी, भाजपची 5 नावांची यादी जाहीर