‘मी देहदान करणार’; धनंजय देशमुखांनी वाढदिवसाला घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता नवीन अपडेट समोर येत आहेत. संतोष देशमुखांना मारहाण होत असतानाचे फोटो समोर आले होते. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यावर धनंजय मुंडे यांंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (political updates)द्यावा लागला होता.

देशमुख परिवार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर आज संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या भावाचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसादिवशी धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांना(political updates) चारा पाण्याची व्यवस्था करायची त्याचबरोबर जे अनाथ आश्रम आहेत त्या ठिकाणच्या मुलाना दत्तक घ्यायचे, जे वन्यजीव प्रकल्प आहेत त्या वन्यजीव प्रकल्पाच्या ठिकाणी जे औषध उपचार लागणार आहेत. त्यासाठी ते मेडिसिन त्या ठिकाणी द्यायचे आणि मी माझ्या जन्मदिनाच्या दिवशी एक संकल्प केला आहे की, मी देहदानाचा संकल्प केला आहे त्याचा मी अर्ज आंबेजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरून दिला आहे.

माझ्या भावाचा लढा आहे त्यासाठी मी हा संकल्प केलेला आहे, आणि माझ्या भावासाठी मी न्याय मिळवण्यासाठी लढणार आहे आणि एवढेच नाही तर मी या दुष्ट प्रवृत्ती हटवण्यासाठी मी लढणार आहे. यासाठी मला तुम्ही सर्वांनी मदत केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी १५०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये अनेक खुलासे होताना दिसत आहेत. वाल्मिक कराड याला क्रमांत एकचा आरोपी केलं असून त्याचा हत्येमध्ये कसा सहभाग होते स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच संतोष देशमुखांची हत्या करताना आरोपींनी काढलेले फोटोही त्यामध्ये आहेत.

संतोष देशमुखांनी मारहाण होत असताना आरोपींना हात पाय तोडा पण मला मुलीसाठी जगू द्या, अशी विनंती केलेली. पण उलट्या काळजाच्या आरोपींनी त्यांना जिवंतपणी असह्य मरणयातना देत तडपवून संपवलं. या प्रकरणामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; तब्बल 250 कर्मचाऱ्यांची ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत ‘घरवापसी’

दररोज न चुकता आवळा खाल्ल्यास 6 आजार होतात छुमंतर; आयुर्वेदातील रामबाण उपाय

‘छावा’ पाहिला अन् ‘या’ किल्ल्यावर अफाट गर्दी जमली: खजिन्याच्या शोधात कुदळ, फावडे घेऊन…; Video Viral

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले