आयसीसीचा वर्ल्ड कप बाबत मोठा निर्णय, भारताचा एका कारणामुळे सराव रद्द

भारतीय संघाबाबत आता आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड मधील (cricket)सामन्यापूर्वी आता सराव करता येणार नाही. कारण भारताच्या सरावाची परवानगी आता आयसीसीने नाकारली आहे. वर्ल्ड कपमधील हा एक मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.भारत टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. पण या तिन्ही सामन्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाला सराव करायला मिळाला होता. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केले. त्यानंतर पाकिस्तानकडून विजय हिसकावला. भारताेन तिसऱ्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला. आता भारताचा चौथा सामना हा कॅनडाबरोबर १५ जूनला होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारताला सराव मात्र करता येणार नाही.

भारतीय संघ सुपर – ८ फेरीत पोहोचला आहे. आता चौथा सामना भारताने जिंकला तर त्यांना साखळी सामन्यांत निर्भेळ यश संपादन करता येऊ शकते. त्यासाठी भारत हा सामना जिंकतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला आता कॅनडाच्या सामन्यापूर्वी सराव करता येणार नाही. कारण हा सामना फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला फ्लोरिडा येथे जोरदार पाऊस सुरु आहे. फ्लोरिडा येथे सध्या पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीत कोणत्याही संघाला सराव करण्यासाठी मैदानात उतरवणे आयसीसीने उचित वाटत नाही, त्यामुळे आयसीसीने आता भारतीय संघाचा सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कॅनडाच्या मॅचपूर्वी भारताच्या संघाला सराव करता येणार नाही.

जर भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात येईल. त्यामुळे जर भारताचा हा सामना पावसामुळे रद्द झाला तर त्यांचे एकूण सात गुण होतील आणि तरीही ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलच स्थानावर राहतील. कारण पाकिस्तान किंवा अमेरिका यांच्यापैकी दोन्ही देशांनी आपला अखेरचा सामान जिंकला तर त्यांचे सहा गुण होतील. त्यामुळे भारताच्या अव्वल स्थानाला यावेळी कोणताही धोका नाही.

हेही वाचा :

अयोध्या अलर्ट मोडवर,राम मंदिर बॉम्बने उडवण्याची दहशतवाद्यांची धमकी.

लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुरप्पा यांना मोठा दिलासा

एकाच फोनमध्ये २ सिमकार्ड वापरताय? भरावा लागू शकतो दंड