गांजा-चरसच्या धुरात आधीच लपेटलेले शहर आता अधिक प्राणघातक नशेच्या विळख्यात सापडत चालले आहे.(stronghold ) मेफेड्रॉन एमडी आणि प्रतिबंधित इंजेक्शनसारख्या घातक ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा शहरात सुरू असल्याचे समोर आले आहे. यावेळी केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारच नव्हे तर ग्रामपंचायत सदस्य, जिम प्रशिक्षक, मेडिकल चालक आणि दिल्लीतून आलेला तरुण इंजिनिअर यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
पोलिस तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ड्रग्जचा पुरवठा जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या माध्यमातूनच केला जात आहे. गांजाच्या कारवायांमुळे काही काळ शांत बसलेले गुन्हेगार आता नव्या पद्धतीने एमडी ड्रग्जचा व्यवहार सुरू करत आहेत.या नशेच्या जाळ्याची व्याप्ती इतकी वाढली आहे की, शहरातील गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत त्याच्या साखळ्या पोहोचल्या आहेत. (stronghold ) समाजातील प्रतिष्ठित घटकही या घातक व्यवसायात हात घालत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘मिशन झिरो ड्रग्ज’च्या घोषणांनंतरही शहरात एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध होत आहे, हे धक्कादायक वास्तव आहे. (stronghold ) एकामागून एक कारवाया होत असूनही पोलिसांकडून या नशेच्या साखळीचा पूर्ण खात्मा झाला नसल्यामुळे हा मुद्दा आता गंभीर स्वरूप धारण करत आहे.
हेही वाचा :