आधार लिंक न केल्यास अर्ज होणार बाद लाडक्या बहिणींनो ९००० रुपये गमवू नका
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. (linked)या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळत आहे. आता या योजनेत २१०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. दरम्यान, जर तुम्ही आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे अर्ज बाद होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्यास सांगिले होते.
लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत.परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुढच्या महिन्यात एकदम ६ हप्ते येऊ शकतात. त्यामुळे (linked) जर तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला असेल अन् आतापर्यंत एकही रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला ९००० रुपये मिळू शकतात
लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये दिले जाऊ शकतात. या योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. (linked)त्याचसोबत महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये असावे. तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा. आतापर्यंत आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?