“मी आमदार झालो तर पोरांचे लग्न करुन देणार”, ‘या’ उमेदवाराचं अजब आश्वासन
सध्या राज्यात विधानसभा(political news) निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आता उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवाराने एक आश्वासन दिल आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
राज्यातील हायव्होलटेज असलेल्या मतदारसंघांपैकी असलेल्या परळी विधानसभा(political news) मतदारसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. तसेच बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे. मात्र आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ देखील केला आहे.
या प्रचाराच्या रणधुमाळीत राजेसाहेब देशमुख यांनी जनतेला अजब आश्वासन दिल आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा देखल रंगली आहे. यावेळी राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात की पोराला नोकरी आहे का? तर आता सरकारच नोकरी देत नाही तर कशी लागणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय राज्यात काही उद्योगधंदा आहे का? तसेच पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असणार? यामुळे आता सर्व पोरांचं लग्न होणं अवघड झालं आहे. त्यामुळे आता सर्व पोरांना मी आश्वासन देतो की, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ. तसेच सगळ्या पोरांना कामधंदा देखील देऊ असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी जनतेला दिले आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! CBI कडून नागरिकत्वाविषयी चौकशी सुरू
ऐन निवडणुकीत बेरोजगार तरुणांच्या नावावर 10 ते 15 कोटींची रक्कम जमा
संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, Video Viral