‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिस मधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?
बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक महिला कर्मचारीने तिच्या साथी कर्मचारी विरुद्ध यौन शोषणाचा गंभीर आरोप लावला आहे. ही घटना जीविका संस्थानशी संबंधित आहे, जिथे पीडित महिला(woman) कार्यरत होती. पीडित महिलेने केलेल्या खुलाशामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनूसार पीडित महिलेने(woman) तिच्या बाॅसवर आरोप केला आहे. समीरकुमार बैठा असं आरोपीचं नाव असून गेल्या साढे चार वर्षांपासून तो सतत यौन शोषण करत होता असा आऱोप करत महिलेने मोठा खुलासा केला.
एवढंच नाही तर, त्याने महिलेला नोकरी टिकावयची असेल तर त्याला खुश ठेवण्यास सांगितलं होतं. या आरोपानुसार, समीर कुमार बैठाने महिलेला फसवून त्याच्या भाड्याच्या घरात नेलं आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याची माहिती आहे.
पीडित महिला युवती जीविका संस्थेमध्ये नोकरी करत होती. ढेकसारा येथे महिलेची समीर कुमार बैठासोबत ओळख झाली. तर, समीर कुमार जीविका संस्थेत बुक-कीपरच्या पदावर कार्यरत आहे. तो छोट्या-छोट्या चूका काढायचा. नोकरी टिकवायची असल्याने मी त्याचं ऐकायची. त्याची वाईट नजर असल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे. बिहारच्या किशनगंजमधलं हे प्रकरण आहे.
तर हे प्रकरण एवढ्यावर न थांबता समीरने गर्भ पाडण्याचं औषध दिल्याचं या महिलेकडून सांगण्यात आलं आहे. तक्रारीनुसार, पीडित युवती काही दिवसांनी गर्भवती राहिली होती. त्यावेळी त्याने गर्भ पाडण्याचं औषध दिलं.
लोकलाजेस्तव मी माझ्या कुटुंबीयांनाही याबद्दल काही बोलली नाही. अखेर एक दिवस या त्रासाला कंटाळून ती महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि घडलेला प्रकार सांगितला.
हेही वाचा :
तब्बल 12 वर्षानंतर चंद्र आणि गुरुची युती; 4 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार
नवीन वर्षासाठी व्हॉट्सॲप घेऊन आलाय खास फीचर्स, कॉलिंग होणार आणखी मजेदार
सोहेल खानच्या Birthday पार्टीत शूरानं नाही तर बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष