गोळ्या घालून नाही तर… तुडवून मारायला पाहिजे होतं; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

बलात्कार अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून(Encounter) आता राज्याचं राजकारण(political) देखील चांगलंच तापलं आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला प्रचंड धारेवर धरलं आहे. यासंदर्भात पोलीस, शाळा प्रशासन आणि राज्य सरकार या तीन घटकांवर विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे.

कारण शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर(Encounter) घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. अशातच आता दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

आरोपी अक्षय शिंदे प्रकरणी खासदार उदयनराजे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक मला याबाबत काहीही घेणदेणे नाही. कारण सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे जे मात्र यांच्या कुटुंबासोबत ही धक्कादायक घटना घडली असती तर काय केले असते? तेव्हा बोलले असते का? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, अगदी त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून बोलत असतो.

याशिवाय चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले आहे. खरं तर अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे असं बेधडक वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

तसेच खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आता देखील झाली पाहिजेत. कारण त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर केला की सरळ त्या आरोपीला लोकांसमोर फाशी द्या असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

अशातच बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी ठाणे पोलिसांच्या एनएचआरसी, न्यायदंडाधिकारी, एसीएस होम आणि सीआयडी यांना देखील पत्र लिहून या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयडी स्थापित करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? काय आहे प्रकरण

‘मेरे मेहबूब’ गाण्यातील स्टेपमुळे तृप्ती डिमरी प्रचंड ट्रोल

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; क्रीडा संकुलासाठी क्रिकेटपटू अजिंक्य राहणेला जमीन